वृक्षाला हजारो वर्ष छोट्याश्या भांड्यात जीवंत ठेवण्याची कला!

TREE - Maharastra Today
TREE - Maharastra Today

निर्सग विविधतेनं बनलाय. फक्त वृक्षांबद्दल बोलयचं झालं तर त्याच्या अनेक प्रजाती आहेत. शेकडो वर्ष जुन्या काही वनस्पती आहेत. यातल्या अनेक वनस्पती तुम्ही पाहिल्या असतील. भल्या मोठ्या अफाट वृक्षांचं संवर्धन कसं करायचं? घरात शो- पीस म्हणून कसं सजवायचं? असा प्रश्न पुर्वीच्या काळी होता. लहानशा भांड्यातही वड आणि पिंपळा सारख्या वृक्षांना शोपीस प्रमाणं उगवण्याची कला म्हणजे ‘बोनसाय’ ही कला जपानमध्ये नावारुपाला आली होती.

चीनमध्ये झाली उत्पत्ती

चीनमध्ये इसवी सन ७०० मध्ये चीनी लोकांनी ‘पुन- साइ’ नावच्या कलेचा विकास केला. एका विशिष्ट पद्धतीचा वापर करुन लहान- सहान भांड्यांमध्ये वृक्ष संवर्धनाला सुरुवात केली. काही खास तऱ्हेच्या वनस्पतींना लहानशा भांड्यात उगवलं जातं. एका कलेचा केवळ एकाच जातीचे लोक वापर करायचे.

चीनच्या लोकांकडून ही कला जपानी लोकांनी अवगत केली. त्यांनी छोट्या छोट्या भांड्यामधून बुटीक झाडं उगवायला सुरुवात केली. अनेक प्रकारच्या झाडांची पैदास बोनसाय म्हणून करण्यात आली. ‘कामाकुरा’ या चीनी संस्कृतीच्यावेळी जैन आणि बुद्ध भिक्षूंनी जपान आणि चीनमधील कला आणि परंपरांची जोपानसना केली होती. या कलांमध्ये पुनसाइ कला सामील होती. चीनच्या सीमेला लागून असलेल्या जपान्यांनी चीन्यांकडून बऱ्याच गोष्टी अवगत करुन घेतल्या. त्यांनी या कलेला ‘बोनसाय’ असं नाव दिलं. ज्याचा अर्थ भांड्यात झाड उगवणे असा होतो.

जपान्यांनी केला कलेचा प्रसार

जपानमध्ये या कलेवर अधुनिक पद्धतीनं काम करायला सुरुवात १२०० वर्षांपूर्वी झाली. जपानी लोकांना खात्री होती की वृक्ष त्याचा महाकाय आकार सोडून एका भांड्यात उगू शकतो. पुर्ण काळजीनं आणि प्रेमानं वृक्षाचं पालन पोषण केलं तर हे शक्य आहे. ज्या भांड्यात जपानी लोक बोनसाय उगवायचे त्याचा तळ खुप खाली असायचा. चीनमध्ये अशी भांडी वापरली जात नसत. ब्रम्हांडाचं सौंदर्य सामावलेली कला असा उल्लेख जपान्यांनी ‘बोनसाय’बद्दल केला.

बोनसाय कलेविषयी जपानमध्ये अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत. ज्यानुसार एका समुराई योद्ध्यानं तीन अखुड वृक्षांच बलिदान देऊन तीन संतांचा जीव वाचवला होता. या लोककथेवर जपानमध्ये नाटकांचं लिखान करण्यात आलंय. जपानी लोकांच्या कित्येक पिढ्यांनी व्यासपीठावर ही नाटकं पाहिली आहेत.

जपान आणि अमेरिकेत आहेत बोन्साय म्यूझियम

एका लहानशा भांड्यात वृक्षांना जिवंत ठेवणं सहज आणि सोप्प वाटत असलं तरं चुक आहे. बोनसाय वाढवायला मोठी मेहनत घ्यावी लागते. जपानमध्ये लोकांनी अनेक वर्षांच्या झाडांना जपून ठेवलंय. बोनसाय विषायचे तज्ञ कोबायाशी यांनी १ हजार वर्ष पुर्वीची वनस्पती संवर्धित करत आहेत. बोनसाय वाढवण्याची कला शिकण्यासाठी सहा ते दरा वर्षांचा कालावधी लागतो.

बोन्साय संवर्धनात फक्त जपान नाही तर अमेरिकाही पुढारलेली आहे. वॉशिंग्टन डी. सी. मधल्या ‘बोन्साइ संग्रहालयात’ ४०० वर्षांपूर्वीचा बोन्सया वृक्ष ठेवण्यात आलाय जो हिरोशिमावर केलेल्या अणू बॉम्ब हल्ल्यात वाचवण्यात आला.

कसा वाढवायचा बोनसाय

तुम्हाला जर घरात बोनसाय झाड लावून घराची शोधा वाढवायची असेल तर त्यासाठी काही मुलभूत बाबी ध्यानात ठेवायला हव्यात. साधारणपणे जपानी लोक मानतात की बोनसाय सांभाळणं म्हणजे एका तान्ह्या मुलाला सांभाळण्यासारखं आहे. बोनसाय झाडं खुप वर्षांसाठी जगावीत अशी सर्वांची इच्छा असते या इच्छेच्या अपूर्तीसाठी त्याची खास काळजी घ्यावी लागते. बोनसाय ज्या भांड्यात वाढतोय, तिथली माती नेहमी ओली ठेवावी लागते. कृत्रीम प्रकाश बोनसायला देऊ नये. नैसर्गिक सुर्यप्रकाशात बोनसाय चांगला वाढतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button