अ‍ॅन्टिजन टेस्टचा रिपोर्ट खराच असेल असे नाही; मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा

MUmbai Muncipal Cooperation -Iqbal Chahal

मुंबई : नागपुरातील (Nagpur) कोरोनाची स्थिती सध्या गंभीर झाली आहे. दिवसागणिक नागपुरात कोरोनाचे (Corona) रुग्ण हजारांच्या संख्येने वाढत आहेत. सुरुवातीला कोरोना नियंत्रणासाठी नागपूरचे नाव अग्रस्थानी होते. तेथे कोरोनाग्रस्तांचा फुगलेला आकडा पाहून नागपूरकरांच्या हृदयात धडकी भरली आहे. त्यातच नागपुरातील कोरोना स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांनी कोरोना संदर्भातील अ‍ॅन्टिजन टेस्टवरच ( antigen test) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अ‍ॅन्टिजन टेस्ट रिपोर्टवर कोणतीच शंका नाही.

मात्र, जे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, ते चूक असू शकतात, असे त्यांनी सांगितले आहे. चहल यांनी आज नागपुरातील माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा दावा केला. ते म्हणाले,  अ‍ॅन्टिजन  टेस्ट निगेटिव्ह असेल आणि तरीदेखील रुग्णामध्ये लक्षणे आढळून येत असतील तर तत्काळ त्याने आरटी-पीसीआर टेस्ट करणे गरजेचे आहे. निगेटिव्ह रिपोर्टसंदर्भात ही टेस्ट तेवढीशी खात्रीशीर नाही. पॉझिटिव्ह आलेल्या रिपोर्टमध्ये कोणतीच समस्या नाही. तसेच, टेस्टची संख्या वाढविण्यापेक्षा त्याच्या गुणवत्तेवर अधिक जोर देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.

मृत्युदर कमी करण्यावर सर्वाधिक जोर देण्याचीही आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. अ‍ॅन्टिजन टेस्टचा उपयोग केवळ गंभीर स्वरूपात आजारी संशयित रुग्णासाठीच करण्यावर भर द्यावा असेही त्यांनी सुचवले. शासकीय व खासगी हॉस्पिटल्समध्ये वॉररूम तयार करण्याचे निर्देश दिले. सोबतच तक्रारींचा निपटारा करण्यासाठी, सीसीटीव्ही लावूनच उपचार करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे, चहल यांनी मुंबई आणि धारावीतील कोरोना रुग्ण नियंत्रित कसे आले याचा अनुभव सांगताना तेथे सर्वांनी समन्वयाने काम पार पडले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: झोपडपट्टीमध्ये जाऊन स्थितीचा अंदाज घेतला. त्यामुळे, परिस्थिती आटोक्यात आणण्यास मदत मिळाली. नागपुरातही अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दौरा करण्याची गरज आहे. ज्या पॉझिटिव्ह रुग्णांकडे वेगळे स्वच्छतागृह नाही किंवा कमी जागा आहे, त्यांच्या नातेवाइकांनाही क्वारंटाईन करावे लागेल, अशा सूचना चहल यांनी केल्या. बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER