आघाडीवरील जनतेचा रोष निवडणुकीत दिसला – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई :- राज्यातील गावागावांतील लोकांनी भाजपला समर्थन दिले आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा (BJP) नंबर एकचा पक्ष बनला आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

ते म्हणालेत, भाजपाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. कोरोना (Corona) काळात, लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकार लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तर, राज्य सरकारने शेतकऱ्यांसह कुणालाही मदत केलेली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात या महाविकास आघाडी सरकारविरोधात रोष आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येऊनदेखील भाजपा नंबर वन पक्ष बनला.

सिंधुदुर्गात तर जवळपास ८० टक्के ग्रामपंचायतींवर भाजपाने कब्जा केला आहे. या ठिकाणी राणे कुटुंबीय, रवींद्र चव्हाण आणि इतरांनी प्रचंड मेहनत केली आहे. आम्ही सत्तेवर असतानादेखील आम्हाला  रत्नागिरीत यश मिळाले नव्हते. मात्र यंदा रत्नागिरीत (Ratnagiri) कामगिरी चांगली झाली आहे. संपूर्ण कोकणात भाजपाने चांगली कामगिरी केली आहे.

ही बातमी पण वाचा : ‘2019 च्या सत्तास्थापनेची चर्चा शरद पवारांसोबत….’; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER