
कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिराचा पश्चिम दरवाजा देवस्थान समितीच्या वतीने आज भाविकांसाठी खुले करण्यात आला. अनेक महिन्याच्या कालावधीनंतर आज अंबाबाई मंदिराचा आवार भक्ताने गजबजून गेला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्ष वैशाली शिरसागर, राजू जाधव, शिवाजी जाधव यांच्या उपस्थितीत मंदिर दरवाजा खुला करण्यात आला. अकरा वाजता मंदिर दरवाजा खुला होणार या बातमीनंतर अनेक भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती . भाविकांना प्रवेश केल्यानंतर सॅनिटायझर करूनच मंदिरात प्रवेश दिला जाणार असून आवारातील सर्व दुकाने खुली झाला आहे .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला