आघाडी सरकार हे एकटे संकट सावरू शकत नाही, केंद्राने मदत करावी- शरद पवार

Sharad Pawar-PM Modi

उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह, पश्चिम महाराष्ट्रात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज आणि उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी तुळजापूर भागातील शेतीची पाहणी करून नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना मदतीसाठी पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे बोट दाखवले.

राज्यात अतिवृष्टीमुळं आलेलं आताचं संकट अस्मानी आहे. त्याचे दीर्घकाळ परिणाम होतील. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या  सरकारबरोबर केंद्रानेही मदत करायला हवी. हे संकट एकटे राज्य सरकार सावरू शकत नाही. त्यामुळे येत्या १० दिवसांत महाविकास आघाडीतील सर्व खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi)यांची भेट घेणार असल्याची माहिती पवार यांनी शेतकऱ्यांना दिली. पवार म्हणाले की, दीर्घ परिणाम करणारं हे अस्मानी संकट आहे.

या परिस्थितीला तोंड देण्याची ताकद  तुमच्यामध्ये आहे. ज्या वेळी शेतकऱ्यांची ताकद  नसते तेव्हा सरकारची ताकद  उभी करावी लागते. ती आम्ही उभी करू. सोबतच केंद्रानेदेखील राज्यांना मदत करायला हवी. मदत करताना राज्याच्या काही मर्यादा आहेत. भूकंपाच्या वेळी मी काही दिवस या भागात फिरत होतो. त्यावेळी पैसे उभे केले. जागतिक बँकेतून पैसे आणले. महाराष्ट्राच्या जनतेनेसुद्धा मदत केली. त्यावेळी मी करू शकलो. आता  त्या संकटाला राज्य सरकार एकटे सावरू शकत नाही, असे मला वाटते.

ही बातमी पण वाचा : पुन्हा शिवसेनेसोबत युती करणार का?; अमित शहांनी स्पष्टीकरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER