माझ्याविरुद्धच्या आरोपांची चौकशी करणार उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश – गृहमंत्री

Anil Deshmukh.jpg

नागपूर : मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करा, अशी मागणी मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना केली होती. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून या आरोपांची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत होणार आयचे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे याला अटक केली. एनआयए या प्रकरणाचा शोध घेते आहे. दरम्यान ठाकरे सरकारने वाझेचे निलंबन करत मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांनाही हटवले. सध्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचे प्रकरण गाजते आहे. अनिल देशमुख यांची याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे.

सचिन वाझेंमार्फत पोलीस दलाला १०० कोटी कलेक्शनचे ‘टार्गेट’ गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. विरोधकांनी या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button