मलिकांनी केंद्रावर केलेला आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावा, अन्यथा… चंद्रकांत पाटील यांचा इशारा

Chandrakant Patil-Nawab Malik

मुंबई :- ‘राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे आता तरी सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने सामान्य माणसाच्या मदतीला धावून जावे आणि सातत्याने केंद्र सरकारवर खोटे आरोप करणे बंद करावे, अशी खरमरीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वारंवार आरोप करा आणि पळून जा, असा प्रकार चालू आहे. पण आता आम्ही हे प्रकरण धसास लावल्याशिवाय राहणार नाही. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवरील आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावा किंवा माफी मागावी.’ अशी मागणी चंद्रकांत पाटील (Chandarkant Patil) यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘आपले अपयश झाकण्यासाठी नेहमी केंद्र सरकारवर आरोप करायचे आणि वाद निर्माण करून कोरोनाच्या संकटापासून जनतेचे लक्ष विचलित करायचे, असे राजकारण महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. सामान्य जनता चारही बाजूने संकटात सापडली असताना आता तरी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी शक्ती एकवटली नाही तर सामान्य लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. ‘ असा इशाराही त्यांनी दिला.

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोग्य सुविधांवरून केंद्र सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देत चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर औषधाबाबत काल केलेला आरोप बालिश आणि हास्यास्पद आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकण्यास १६ कंपन्यांना मनाई केली, असा धादांत असत्य आरोप त्यांनी केला. त्यासाठीचे पुरावे मागितले तर त्यांनी ते दिलेले नाहीत. केंद्रावर आरोप केला असताना त्यांनी गुजरात सरकारचा आदेश दाखविला. एखाद्या कंपनीने रेमडेसिवीर विकण्यासाठी गुजरात सरकारला परवानगी मागितली तर ते सरकार केवळ त्यांच्या राज्यापुरताच आदेश देऊ शकते. महाराष्ट्र सरकारनेही असाच आदेश दिला आहे. असं असताना नवाब मलिक यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आरोपाची केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दखल घेतली आणि माहिती देण्याची विनंती केली. नवाब मलिक यांनी माहिती दिली नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : देशातील १६ निर्यातदारांकडे २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी ;कुपी विकायला केंद्रसरकारचा नकार – नवाब मलिक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button