१८ ते ४४ वयोगटाच्या टप्प्यात वयानुसार गट पडणार; राजेश टोपेंनी दिले संकेत!

Rajesh Tope - Maharashtra Today

मुंबई :- राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराबाबत आणि उपाययोजनांबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्रासह देशभरात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. राज्य सरकार १८ ते ४४ या वयोगटासाठीच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये वेगवेगळे स्लॉट करून त्यानुसार लसीकरण करण्याची शक्यता आहे.

लसींचा साठा अपुरा असल्यामुळे १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य सरकारने मोजक्या केंद्रांवरच लसीकरण सुरू केले आहे. कारण लसीकरण केंद्रावर नागरिकांची प्रचंड गर्दी होऊ नये. याविषयी राजेश टोपे म्हणाले की, “मेट्रो शहरांमधून ज्यांना तंत्रज्ञानाची जाण आहे अशा लोकांनी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करून केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घेतले. त्यामुळे स्थानिक भागात अस्वस्थता निर्माण झाली. या समस्यांवर मुख्यमंत्र्यांशी मी बोललो. लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला स्लॉट द्यावे लागणार. मग वयोगटाचा किंवा कोमॉर्बिडिटीचा स्लॉट देता येईल. म्हणून ३५ ते ४४ या वयोगटातल्या लोकांना प्राधान्य देता येईल का? यातही सहव्याधी असलेल्यांना अधिक प्राधान्य देता येऊ शकेल. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे.”

स्पुटनिकसाठी चर्चा सुरू!

रशियावरून आलेल्या ‘स्पुतनिक व्ही’ लसीच्या दराबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली आहे. लवकरच ‘स्पुतनिक व्ही’ लसीची किंमत निश्चित करण्यात येणार आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button