कोल्हापूर -सांगलीच्या मूर्तिकारांची नुकसान भरपाई प्रशासनाने घ्यावी : शरद पवार

index

मुंबई :  मुसळधार पाऊसामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पुरामुळे मृत्यू झाला आहे. इतकेच नाही तर हा महापूर मूर्तीकारांना देखील महागात पडला आहे. काही दिवसांनीच सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. या उत्सवामुळे सर्वत्र चैतन्य असते. . व्यापारी , छोटे – मोठे व्यावसायिक उत्साही असतात. खासकरून मूर्तिकारांसाठी हा खुप मोठा सण असतो. अनेक मूर्तिकरांनी बाप्पाच्या मूर्ती एक महिन्या अगोदर पासूनच बनविल्या होत्या . मात्र महापुराने सर्व मुर्त्यांचे नुकसान झाले आहे. सरकारने या मूर्तिकारांच्या झालेल्या नुकसानाची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार केली आहे.

शरद पवार गेले दोन-तीन दिवस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी कोल्हापूर येथील बापट कॅम्पमध्ये संत गोरा कुंभार वसाहतीत पूरग्रस्त झालेल्या समाजाला शरद पवार यांनी भेट दिली. या ठिकाणी गणपती कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र आलेल्या महापुरात त्यांचेही नुकसान झाले आहे.
महापुरामुळे कोल्हापूर-सांगली जिल्ह्याचं अतोनात नुकसान झालं आहे. या जिल्ह्यांना पुन्हा उभं करण्यासाठी मदतीची गरज आहे. दोन्ही जिल्हे आठवडाभर पाण्यात होते. येथील नागरिकांवर उपासमारीचे संकट तर आहेच पण सध्या रोगराई पसरण्याची भीती आहे. कारण दोन्ही जिल्हे आठवडाभर पाण्यात होते.अनेक घरांची पडझड झाली आहे. गुरं-ढोरं वाहून गेली आहेत. शेती आणि पीकं पूर्णत: नष्ट झाली आहे, त्यामुळे या भीषण संकटातून कसं सावरायचा असा प्रश्न कोल्हापूर-सांगलीच्या नागरिकांना आहे.

दरम्यान अद्यापही सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे एनडीआरएफ, नौदल, लष्कर आणि तटरक्षक दल यांच्या विविध पथकांद्वारे मदतकार्य सुरू आहे.