पैसे कमवण्याची मशीन झाली होती ही अभिनेत्री

Maharashtra Today

बॉलिवूडमध्ये (Bollywood)ज्याप्रमाणे श्रीमंताची मुले मोठ्या प्रमाणावर येतात त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये यश मिळवण्याची महत्वाकांक्षा मनात ठेऊन अनेक मध्यमवर्गीय घरातील मुले-मुलीही येतात. त्यांन बॉलिवूडमध्ये प्रवेश करणे तसे कठिण असते, पण प्रत्येक संकटावर मात करीत यश मिळण्यासाठी धडपडणाऱ्या या कलाकारांना कधी ना कधी यश मिळतेच. मात्र केवळ पैसा कमवणे हाच उद्देश्य असला की तो कलाकार लवकर बाहेर फेकला जातो. याची काही उदाहरणे असले तरी कोणीही ते कबुल करीत नाही पण एका अभिनेत्रीने मात्र केवळ पैसे कमवण्याची मशीन (money-making machine) झाल्याने मी बाहेर फेकली गेले अशी कबुली दिली आहे.

ही अभिनेत्री आहे बंगाली बाला रिमी सेन. (Rimi Sen) रिमी सेनने तेलुगु सिनेमातून नायिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. तर २००३ मध्ये आलेल्या ‘हंगामा’ सिनेमातून रिमीने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. या सिनेमानंतर रिमीने ‘क्योंकि’, ‘जॉनी गद्दार’, ‘धूम’, ‘गरम मसाला’, ‘गोलमाल’, ‘फिर हेरा फेरी’ असे मोठ्या नायकांबरोबर मोठे सिनेमे केले खरे पण लवकरच ती पडद्याबाहेर निघून गेली. आता पुन्हा एकदा ती बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाल्याचे म्हटले जात आहे. याबाबत रिमीशी बोलताना तिने सांगितले, मी पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करण्यास सज्ज झाले आहे. मात्र यावेळी मी कॅमेऱ्यासमोर नव्हे तर कॅमेऱ्याच्या मागे दिसणार आहे. मला खरे तर दिग्दर्शक बनण्याची इच्छा होती. पण आमची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने लहानपणापासूनच मी काम करण्यास सुरुवात केली होती. मी जेव्हा काम करण्यास सुरुवात केली तेव्हा मी शाळेत जात होती. केवळ पैसे कमवणे हाच उद्देश्य असल्याने मी जे मिळेल ते काम करीत होते. मी कधीही स्टारडमकडे लक्ष दिले नाही. मी केवळ पैसे कमवणारी मशीन झाले होते. माझे लक्ष फक्त आमची आर्थिक स्थिती चांगली करणे हेच होते. मला कॅमेऱ्यासमोर रंग लावून काम करण्यापेक्षा कॅमेऱ्यामागे काम करणे आवडते. माल माझ्या आवडीचे काम मिळत नसल्यानेच मी सिनेमापासून दूर झाले. पण आता पुन्हा एकदा मी माझ्या आवडत्या कामामुळे परत येत आहे. असेही रिमी म्हणाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button