रोमँटिक दृश्य असल्याने ब्रॅड पिटबरोबर काम करण्यास या अभिनेत्रीने दिला होता नकार

Aishwarya Rai Bachchan

हॉलिवुडच्या (Hollywood) चित्रपटात काम करण्याची बॉलिवुडमधील बहुतेक कलाकारांची इच्छा असते. हॉलिवुडच्या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली तरी त्याचा गाजावाजा करून हॉलिवुडमध्ये काम करण्याचा डांगोरा पिटणारे कलाकार कमी नाहीत. हिंदी चित्रपटात अंग प्रदर्शन आणि चुंबनदृश्य देण्यास तयार असलेल्या आणि असे काम केलेल्या नायिकाही नुसते दिसण्यासाठीही हॉलिवुडचा चित्रपट करतात. अशा अनके नायिकांची नावे घेता येतील. 2004 मध्ये एका नायिकेने हॉलिवुडचा सुपरस्टार ब्रॅड पिटबरोबर काम करण्यास नकार दिला होता.

Brad Pitt Wanted To Work With Aishwarya Rai Bachchan Even After She Rejected To Star In Troy - OFFCया नकाराचे कारण वाचाल तर चकित व्हाल. ब्रॅड पिटबरोबर (Brad Pitt) चित्रपटात रोमँटिक दृश्ये करावी लागणार होती म्हणून ब्रॅड पिटसोबतचा चित्रपट करण्यास नकार दिल्याचे या नायिकेने सांगितले होेते. मात्र याच नायिकेने हिंदीमध्ये भरपूर अंग प्रदर्शन तर केले होेतेच चुंबनदृश्यही दिले होेेते. ही नायिका दुसरी कोणी नसून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आहे. ब्रॅड पिटने एका मुलाखतीत सांगितले होते की, ऐश्वर्या खूप चांगली अभिनेत्री असून तिच्यासोबत काम करण्याची इच्छा होती आणि आहे. ट्रॉय चित्रपटात आम्ही दोेघे काम करणार होतो. परंतु चित्रपटात लव मेकिंग दृश्ये असल्याने ऐश्वर्याने नकार दिल्याचेही ब्रॅड पिटने सांगितले होते.

ही बातमी पण वाचा : केवळ मुलगी आराध्याच नाही तर या गोष्टीशिवाय जगू शकत नाही ऐश्वर्या राय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER