बॉलिवुडचा पहिला बोल्ड फोटो शूट केला होता या अभिनेत्रीने

Begum Para

बॉलिवुडमध्ये नायिकांचे स्थान शोभेपुरते असते. त्यांच्याकडून भरपूर अंग प्रदर्शन करवून घेणे हेच निर्माता आणि दिग्दर्शकांचे मुख्य काम असते. चित्रपटात काम करण्याची इच्छा असणाऱ्या अनेक मुली स्वतःचा पोर्टफोलियो तयार करतात. या पोर्ट फोलियोमध्ये सेक्सी आणि बोल्ड फोटोंचाही समावेश असतो. बोल्ड लुकमध्ये कशा दिसतो हे दाखवण्याचा प्रयत्न या नवीन मुली करीत असतात. तर अनेकदा बॉलिवुडमध्ये काम करीत असतानाही अनेक नायिकांनी स्वतःच बोल्ड फोटो शूट करन स्वतःचे वेगळे रुप दाखवलेले आहे. अनेक नायिकांचे फोटोशूट प्रचंड गाजलेही होते. पण बॉलिवुडमध्ये अशा प्रकारे बोल्ड फोटो शूट करण्यात कोणत्या नायिकेने सुरुवात केली हे आमच्या वाचकांना कदाचित ठाऊक नसेल.

पहिल्या बोल्ड फोटोशूटसाठी तयार झालेल्या या अभिनेत्रीचे नाव आहे बेगम पारा (Begum Para) . हे नाव तुम्हाला आठवणारच नाही. याचे कारण स्वातंत्र्यांपूर्वी चित्रपटसृष्टीत काम करणारी बेगम पारा फाळणीनंतर पाकिस्तानात गेली होती. परंतु भारताची ओढ असल्याने ती पुन्हा भारतात आली आणि युसूफ खान उर्फ दिलीपकुमारच्या भावाबरोबर म्हणजे नासर खानसोबत लग्न केले आणि भारतातच राहू लागली.

बेगम पारा ने 1944 मध्ये चांद चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. यात तिचा नायक होता प्रेम अदीब आणि या चित्रपटात व्हॅम्पची भूमिका साकारली होती सितारा देवीने. हा चित्रपट हिट झाल्यानंतर बेगम पाराला महिन्याला 1500 रुपये पगार दिला जाऊ लागला होता. बेगम पाराने शेवटचा चित्रपट 2007 मध्ये संजय लीला भंसाळीचा सांवरिया केला होता. यात ती सोनम कपूरची आजी झाली होती. तर विषय होता बोल्ड फोटोंचा.

1951 मध्ये लाइफ मॅगझिनने बेगम पाराशी संपर्क साधून बोल्ड फोटोशूट करण्याची ऑफर दिली. प्रथम तर बेगम पाराने याला नकार दिला. परंतु नंतर जेव्हा जास्त पैशांची ऑफर दिली तेव्हा बेगम पारा तयार झाली आणि पहिले बोल्ड फोटो शूट केले. सफेद साडी नेसून अंग प्रदर्शन करण्याबरोबरच सिगरेटचा धुर सोडत वेगवेगळ्या पोजमध्ये बेगम पाराने फोटोशूट केले होते. लाइफ मॅगझिनने हे सर्व फोटो प्रामुख्याने छापले आणि देश-विदेशात बेगम पाराच्या नावाची चर्चा होऊ लागली होती. सोबत असलेल्या फोटोंवरून तुम्हाला या बोल्ड फोटोशूटची कल्पना येईल.

80 च्या दशकापासून ते आतापर्यंत अनेक नायिकांनी बोल्ड फोटो शूट केले. काही नायिकानी तर टॉपलेस फोटोही दिले आणि खळबळ माजवली होती. कर काही नायिकांनी पूर्णपणे न्यूड होऊनही फोटोशूट केले. पूजा भट्ट, ममता कुलकर्णी ही नावे लगेचच यासाठी आठवतात. गेल्या काही वर्षात मात्र नव्या मुलींनी बिनधास्त बोल्ड फोटो शूट केले आहे. यात सगळ्यात जास्त फोटोशूट गाजले ते इशा गुप्ताचे. इशा गुप्ताने असे काही फोटो दिले आहेत की ते पहाता तिच्या बोल्डपणाचा अंदाज येतो.

यानतंर जॅकलीन फर्नांडिसनेही एका मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट करून आपण किती आधुनिक आहोत हे दाखवून दिले. खरे तर यापूर्वीही ममता कुलकर्णी आणि अन्य अनेक नायिकांनी टॉपलेस फोटो दिले आहेत. पण तेव्हा हंगामा होत असे. आता हंगामा होत नाही. आता त्याकडे कलेच्या नजरेने पाहिले जाते. आणि नायिकाही

आलिया भटट्नेही टॉपलेस फोटो शूट केले असून श्रद्धा कपूरनेही संपूर्ण पाठ उघडी दाखवणारे फोटो शूट केले आहे. एका कँलेंडरसाठी दिशा पटनीने फक्त पायात बूट घालून फोटोशूट केले आहे. तर एका अंडरगारमेंटसाठीही दिशाने फोटोशूट केले आहे.सैयमी खेरनेही एका मॅगझिनसाठी असेच अंग प्रदर्शन करणारे फोटोशूट केले आहे.

नायिकांनी जाहिरातीसाठी, कॅलेंडरसाठी आणि पोर्टफोलियोसाठी भरपूर अंग प्रदर्शन करून पुढारलेपणा दाखवला आहे. पण बेगम पाराने जो बोल्डनेस त्या काऴात दाखवला होता त्याला मात्र तोड नाही असेच म्हणावेसे वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER