सिनेमासाठी बाळंतपणाचे खरे दृश्य दिले होते या अभिनेत्रीने

Shweta Menon - Kalimannu

वास्तववादी सिनेमासाठी दिग्दर्शक सिनेमात वास्तव चित्रण करण्याकडे लक्ष देतात. एवढेच नव्हे तर कलाकारही आपली भूमिका खरी वाटावी म्हणून मेहनत घेत असतात. खेळाडूची भूमिका असेल तर त्यासाठी जिममध्ये जाणे, ऐतिहासिक चित्रपट असेल तर तलवारबाजीचे शिक्षण घेणे, अॅक्शनसाठी बाईक चालवण्याचे शिक्षणही नायिका घेतात. मात्र एका नायिकेने तर या सगळ्यांवर मात करीत भलतेच वास्तववादी दृश्य एका सिनेमात दिले होते. तिने दिलेले दृश्य पाहिल्यानंतर प्रेक्षकही चकित झाले होते. त्यांना हे दृश्य खरे असेल असे वाटलेच नव्हते. पण ते खरे दृश्य आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटले होते.

सिनेमात बाळतंपणाचे दृश्य असेल तर त्यात फक्त गरोदर बाईच्या त्रासाचा आणि नंतर बाळाच्या रडण्याचा आवाज येतो आणि दृश्य पूर्ण होते. पण एका अभिनेत्रीने तर एका सिनेमात चक्क तिच्या डिलिव्हरीचे चित्रीकरण करण्याची परवानगी दिली होती. आणि तिच्या डिलिव्हरीचे दृश्य शूट करण्यासाठी तीन कॅमेरे हॉस्पिटलच्या रूममध्ये लावण्यात आले होते. आणि त्यावेळी दिग्दर्शकासह, तंत्रज्ञ आणि त्या नायिकेचा पतीही उपस्थित होता. ही नायिका आहे श्वेता मेनन (Shweta Menon) आणि तिने ‘कलीमन्नू’ या सिनेमासाठी हे दृश्य दिले होते.

२०१३ मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाचा दिग्दर्शक होता ब्लेस. महिलांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते ते त्याने या सिनेमात दाखवले होते. यात एक दृश्य बाळंतपणाचेही होते. दिग्दर्शक ब्लेसीला हे दृश्य वास्तववादी शूट करण्याची इच्छा होती. पण कुठलीही बाई तिच्या बाळंतपणाच्या वेळी त्याचे शूटिंग करण्यासाठी परवानगी देणार नाही. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न दिग्दर्शकाला पडला होता. पण त्याच काळात श्वेता मेनन गरोदर होती. दिग्दर्शकाची इच्छा पाहून श्वेताने तिच्या पतीशी चर्चा केली आणि बाळतंपणाच्या वेळी शूटिंग करण्यास दिग्दर्शकाला परवानगी दिली. यासाठी सिनेमाचे शूटिंग सहा महिने पुढे ढकलण्यात आले होते. चित्रपटातही श्वेता गरोदर दाखवली असल्याने पाच महिन्यांची गर्भवती असल्यापासूनच तिचे शूटिंग करण्यात आले होते. तिच्या बाळंतपणाचे दृश्य जवळजवळ ४५ मिनिटांचे होते.

सिनेमात अशी दृश्ये देण्यासाठी धाडस लागते आणि ते धाडस श्वेता मेननने दाखवले होते. त्यानंतर मात्र कोणत्याही नायिकेने असे दृश्य दिल्याचे ऐकीवात नाही. साधा मेकअप न करता शूटिंग केले तर नायिका त्याचा केवढा उदो उदो करतात. पण श्वेताने इतके महत्त्वाचे दृश्य देऊनही तिने याबाबत कधी काही सांगितले नव्हते. आता अचानक ही घटना पुढे आल्याने सगळे जण श्वेताच्या धाडसाचे कौतुक करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER