नवऱ्याला अपघाती गोळ्या झाडल्यामुळे हि अभिनेत्री झाली होती विधवा, नंतर वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी केले लग्न

Leena Chandavarkar

पूर्वीची अभिनेत्री लीना चंदावरकर (Leena Chandavarkar) ७० वर्षांची झाली आहे. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९५० रोजी कर्नाटकात झाला होता. अनेक सुपरहिट चित्रपटांत काम करणारी लीना वयाच्या २५ व्या वर्षी विधवा झाली होती. त्याच्याबरोबर ही घटना लग्नाच्या काही दिवसानंतरच घडली. १९७५ मध्ये त्यांचे लग्न राजकीय कुटुंबातील सिद्धार्थ बांडोडकर यांच्याशी झाले. सिद्धार्थला चुकून गोळ्या लागल्या होत्या. त्यांच्यावर काही दिवस उपचार सुरू होते पण ते वाचू शकला नाही. त्यानंतर त्यांनी १९८० मध्ये वयाने २१ वर्ष मोठे असलेले किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. तथापि, त्यांचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते.

लीनाने वयाच्या १९ व्या वर्षी चित्रपटांत पाऊल ठेवले. चित्रपटात दिसण्यापूर्वी ती जाहिरातींमध्ये काम करायची. ‘मन का मीत’ या चित्रपटाद्वारे लीनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती खूपच पुराणमतवादी मनाची होती आणि म्हणूनच तिने सिनेमांमध्ये कधीही बिकिनी परिधान केली नव्हती आणि फोटोशूटही कधी केले नाही.

लीनाचा चित्रपटाचा प्रवास चांगला होता पण वैयक्तिक आयुष्यात अनेक दुःख होते. चित्रपटांमध्ये काम करताना तिचे लग्न पॉलिटिकल फॅमिलीच्या सिद्धार्थ बांडोडकर यांच्याशी झाले होते. दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

वास्तविक, अपघाती गोळीबार झाल्याने सिद्धार्थचा मृत्यू झाला. लीना वयाच्या २५ व्या वर्षी विधवा झाली. पतीच्या निधनानंतर ती खूप एकटी पडली आणि नैराश्यात गेली. लीनाने लोकांना भेटणेही बंद केले होते.

लीनाची अशी परिस्थिती पाहून तिच्या वडिलांनी तिला परत घरी आणले, पण तेथील नातेवाईकांनीही तिला विचित्र डोळ्यांनी पाहत होते. याच कारणास्तव लीना मुंबईत परतली आणि पुन्हा चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरवात केली.

यावेळी लीनाची भेट किशोर कुमार यांच्याशी झाली. दोघांमध्ये जवळीक वाढले आणि दोघांनी १९८० मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. लीनाचे वडील ह्या लग्नाच्या विरोधात होते, कारण ज्या माणसाचे आधीच तीन वेळा लग्न झाले आहे अश्या माणसाबरोबर आपल्या मुलीने लग्न करुनये अशी त्यांची इच्छा होती.

लीना आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन किशोरशी लग्न करते. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला. लग्नाच्या काही वर्षानंतर किशोर कुमार यांचेही निधन झाले आणि लीना पुन्हा एकदा विधवा झाली. त्यावेळी लीनाचे वय ३७ वर्ष होते.

१९६८ च्या ‘मन का मीत’ या चित्रपटात लीना मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट झाली होती. यानंतर एकामागून एक लीनाला अनेक चित्रपटांची ऑफर आली. लीनाने ‘हमजोली’ चित्रपटात जीतेंद्रबरोबर काम केले होते. असे म्हणतात की त्या काळात दोघांच्या अफेअरचीही चर्चा चांगली होती.

लवकरच लीना चित्रपटांसाठी एक मोठे नाव झाली. लीनाने राजेश खन्नाबरोबर ‘मेहबूब की मेहंदी’ चित्रपटात काम केले होते. लीनाचा ‘बिदाई’ हा चित्रपट सर्वाधिक हिट झाला होता. १९८५ साली ‘सरफरोश’ चित्रपटात ती अखेरच्या वेळी दिसली होती. सध्या लीना तिचा सावत्र मुलगा गायक अमित कुमार, सुमित कुमार सोबत मुंबईत राहत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER