13 व्या वर्षी ही अभिनेत्री झाली होती आई

moondru mudichu sridevi

चित्रपटात (Movie) काम करताना कलाकारांना अनेकदा वेगळ्या भूमिका साकाराव्या लागतात. अनुपम खेरला ऐन जवानीत 60 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारावी लागली होती. पुरुष अभिनेत्याचे आपण समजू शकतो परंतु नायिका बनण्यासाठी आलेल्या तरुण मुलीने नायकाच्या आईची भूमिका साकारणे म्हणजे धाडसाचेच म्हटले पाहिजे. हे धाडस केले होते स्वर्गीय अभिनेत्री श्रीदेवीने (Shridevi). आणि विशेष म्हणजे श्रीदेवी कोणाची आई झाली होती तर चक्क रजनीकांतची. त्यातही ही भूमिका सावत्र आईची होती. आता तुमची उत्सुकता वाढली असेल तर या चित्रपटाबाबत थोडी माहिती देतो.

Sridevi's Iconic Movies: List of Bollywood & Tamil Movies of Sridevi |  VOGUE India | Vogue India1976 मध्ये के. बालचंदर यांनी मुंदुरू मुडिचू (Munduru Mudichu) या तामिळ भाषेतील (Tamil Language) चित्रपटाला सुरुवात केली होती. चित्रपटाचे नायक होते कमल हसन (Kamal Hassan) आणि रजनीकांत. आणि नायिका होती 13 वर्षांची श्रीदेवी. रजनीकांतची यात नकारात्मक भूमिका होता. कमल हसन आणि रजनाकांत  (Rajnikant)एकमेकांचे मित्र असतात. कमल हसन श्रीदेवीवर प्रेम करीत असतो तर रजनीकांत श्रीदेवीवर.

एक दिवस तिघे बोटिंग करीत असताना कमल हसन पाण्यात पडतो. परंतु पोहायला येत नाही असे सांगून रजनीकांत कमल हसनला वाचवण्यासाठी पाण्यात उडी टाकत नाही.

श्रीदेवीला रजनीकांतची चाल लक्षात येते. घरी परत आल्यावर रजनीकांतचा कावा लक्षात आल्याने श्रीदेवी चक्क रजनीकांतच्या वडिलांबरोबर लग्न करते आणि रजनीकांतची सावत्र आई बनते. त्यामुळे रजनीकांतला नाईलाजाने श्रीदेवीला आई म्हणावे लागते. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी श्रीदेवीला रजनीकांतपेक्षा जास्त पैसे देण्यात आले होते. रजनीकांतला 3 हजार रुपये तर श्रीदेवीला 5 हजार रुपये देण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER