या अभिनेत्याला दहशतवादी म्हणून एअरपोर्टवर रोखण्यात आले होते

Sunil Shetty

चित्रपटासाठी घेतलेल्या वेगळ्या लुकमुळे लॉस एंजिलिस एअरपोर्टवर (Los Angeles Airport) एका अभिनेत्याला चक्क दहशतवादी म्हणून रोखण्यात आले होते. आपण दहशतवादी नसून हिंदी चित्रपटातील एक कलाकार आहे हे पटवून देण्यात या कलाकाराला खूप मेहनत करावी लागली होती. अखेर त्याच्याकडचे सर्व पुरावे पाहिल्यानंतरच या कलाकाराला जाऊ देण्यात आले होते.

फिल्म 'कांटे' की पूरी कास्ट.संजय गुप्ता (Sanjay Gupta) यांनी आपल्या कांटे चित्रपटासाठी बॉलिवुडच्या टॉपच्या कलाकारांना साईन केले होते. गुन्हेगारीपट असल्याने सर्व कलाकारांना रफ टफ आणि गुंडांसारखा लुक देण्यात आला होता. यासाठी काही कलाकारांनी खरोखर दाढीही वाढवली होती. संपूर्ण चित्रपट अमेरिकेत शूट केला जाणार असल्याने सगळी टीम अमेरिकेला रवाना झाली होती. याच वेळेस या अभिनेत्याला विमानतळावर पोलिसांनी रोखले. या अभिनेत्याचा लुक पोलिसांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याची चौकशी सुरु केली. या कलाकाराने सर्व पुरावे देत चित्रपटासाठी हा लुक घेतल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांचे समाधान झाल्यानंतरच या कलाकाराला सोडण्यात आले. हा कलाकार होता अभिनेता सुनिल शेट्टी (Sunil Shetty), चित्रपटात सुनिल शेट्टीने मार्क नावाच्या बाऊंसरची भूमिका साकारली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER