आमिर खानचा बॉडीगार्ड होता हा अभिनेता

Amir Khan & Ronit Roy

मुंबईत मेहनत करणाऱ्यांना यश मिळतेच. यश कधी मिळेल ते सांगता येत नसले तरी ते नक्कीच मिळते हे अनेकांच्या उदाहरणांवरून आपल्याला दिसून येते. असेच एक चांगले उदाहरण आहे प्रख्यात अभिनेता रोनित रॉय. रोनित रॉय मुंबईत अभिनेता बनण्यासाठी आला होता. परंतु त्याच्या ओळखीचे येथे कोणीही नव्हते. त्याने प्रयत्न सुरु केला. काही चित्रपट त्याला मिळालेही परंतु एखाद्या नायकाला जसे यश मिळावयास हवे तसे यश मिळत नव्हते. चित्रपट मिळणेही कठिण झाले होते.

तेव्हा रोनितने कलाकारांना खासगी सुरक्षा देण्यासाठी एका एजंसीची सुरुवात केली. सुरुवातीला ज्या कलाकारांनी त्याच्याकडून सुरक्षा घेतली त्यात आमिर खानचाही समावेश होता. आमिर खान मोठा स्टार असल्याने रोनित स्वतः त्याच्यासोबत राहात असे. जवळ जवळ दोन वर्ष रोनितने आमिरचा बॉडीगार्ड म्हणून काम केले.

स्वतः रोनितनेच प्रस्तुत प्रतिनिधीला ही गोष्ट सांगितली होती. सध्या रोनितचा खासगी सुरक्षा पुरवण्याचा व्यवसाय प्रचंड मोठा झाला असून बॉलिवुडचे बहुतेक सगळे मोठे कलाकार त्याचे क्लायंट आहेत. एका पार्टीत एकता कपूरची रोनितबरोबर भेट झाली. दोघांमध्ये गप्पा झाल्या आणि एकताने रोनितला छोट्या पडद्यावर संधी दिली. छोट्या पडद्यावर मात्र रोनितला जे यश अपेक्षित होते ते मिळाले. त्याचे नाव झाले, पैसाही मिळाला. अशाच यशाची त्याने अपेक्षा केली होती. आता तर तो चित्रपटांमध्येही व्यस्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER