हा नायक गर्लफ्रेंडचा विश्वास जिंकण्यासाठी लग्नाचे आश्वासन देत असे

Akshay-Kumar-Shilpa-Shetty

हिंदी सिनेमात असे अनेक नायक दाखवले जातात जे मुलींना फसवत असतात. त्यांचा  विश्वास जिंकण्यासाठी तो खोटे लग्नही करीत असे. अशा घटना वास्तवात घडतानाही दिसतात. कधी एकच मुलगा अनेक मुलींशी लग्न करतो तर कधी एक मुलगी अनेक मुलांना लग्नाच्या जाळ्यात गुंतवून फसवते. ‘तो मी नव्हेच’ हे प्र. के. अत्रे यांनी लिहिलेले नाटक याच विषयावर होते. प्रभाकर पणशीकर यांनी वेगवेगळी रूपे घेऊन मुलींना फसवणाऱ्या लखोबा लोखंडेची भूमिका केली होती. यावर हिंदीत ‘वो मैं नहीं’ हा सिनेमाही काढण्यात आला होता. यात नवीन निश्चलने ही भूमिका केली होती. आज या सगळ्या गोष्टींची आठवण येण्याचे कारण म्हणजे शिल्पा शेट्टीची एक मुलाखत.

बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक नायक-नायिकांच्या जोड्या पडद्यावर हिट होतात आणि एकत्र काम करीत असल्याने त्यांच्यात जवळीकही निर्माण होते. बॉलिवूडमध्ये अक्षयकुमारची (Akshay Kumar) अशी अनेक नायिकांबरोबर जवळीक झाली होती. यात शिल्पा शेट्टी, रविना टंडन, प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) यांचा समावेश आहे. अक्षयकुमार आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांची जवळीक तर लग्नापर्यंत गेली होती. परंतु असे काही तरी घडले आणि हे दोघे वेगळे झाले. शिल्पा शेट्टीने अनेक वर्षांनंतर यावर मत व्यक्त करीत अक्षयने ट्विंकलसाठी दगा दिल्याचे सांगत, पण मी त्यातून बाहेर पडून नवा मार्ग स्वीकारला होता, असेही स्पष्ट केले आहे.

अक्षयशी ब्रेकअप झाल्यानंतर शिल्पाने एक मुलाखत दिली होती. शिल्पाच्या म्हणण्यानुसार ती अक्षयकुमारसोबत अत्यंत गंभीर रिलेशनशिपमध्ये होती. परंतु अक्षय दिलफेंक आशिक होता. त्यामुळे त्याच्या जीवनात मुली येत असत. अक्षयने शिल्पाचा दोनदा वापर केला आणि तिला सोडून दिले. अक्षयकुमार त्याच्या प्रत्येक गर्लफ्रेंडचा विश्वास जिंकण्यासाठी तिच्याशी साखरपुडा करून प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात घेऊन जात असे आणि तेथे लग्नाचे आश्वासन देत असे. मात्र नंतर तो सर्व विसरून जात असे आणि त्या मुलींना सोडून देत असे, असा आरोपही शिल्पाने केला होता. रवीना टंडननेही अक्षयकुमारवर असाच आरोप केला होता.

अक्षयने १७ जानेवारी २००१ मध्ये ट्विंकल खन्नासोबत लग्न केले आणि आता हे जोडपे सुखाचा संसार करीत आहे. शिल्पानेही मागील सर्व गोष्टी विसरून जाऊन नव्याने सुरुवात केली असल्याचे सांगितले. अक्षयकुमारने मात्र शिल्पा वा रवीनाच्या कोणत्याही आरोपांना उत्तर दिलेले नाही.

ही बातमी पण वाचा : प्रभासच्या ‘राधे-श्याम’च्या प्री टीझरवर फॅन्सच्या उड्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER