दोन आठवड्यात 49 चित्रपट साईन केले होते या अभिनेत्याने

Govinda

बॉलिवुडमध्ये (Bollywood) एखाद्या कलाकाराचा एखादा चित्रपट हिट झाला की लगेचच त्याला साईन करण्यासाठी निर्मात्यांची रांग लागते. अर्थात हे मी तुम्हाला सांगतोय ती 80 च्या दशकातील गोष्ट आहे. सध्या तशी परिस्थिती नाही. तर 1985 मध्ये एक तरुण मुलगा हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्याचा विचार करून मुंबईला आला आणि येथे संघर्ष करू लागला. तो चांगला नाचायचा म्हणून त्याने आपले काही व्हीडियो तयार केले होते. आपले व्हीडियो घेऊन तो निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये चकरा मारत राहायचा पण त्याला कोणीही काम देत नव्हते.

Ilzaam | Showreel | Govinda | Shatrughan Sinha | Full HD Hindi Action Movie - YouTubeअशातच एकदा हा तरुण एकदा निर्माता-दिग्दर्शक पहलाज निहलानींच्या ऑफिसमध्ये पोहोचला. पहलाज निहलानी यांनीही त्याची भेट घेतली. त्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याचे व्हीडियोही घेतले.

काही दिवसांनी पहलाज निहलानी यांनी या तरुणाला बोलावले आणि आपल्या नव्या चित्रपटासाठी साईन केले. हा चित्रपट होता शिबू मित्रा (Shibu Mitra) दिग्दर्शित इल्जाम (Iizaam) आणि हा तरुण होता गोविंदा.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला आणि गोविंदा स्टार झाला. गोविंदा हे चलनी नाणे असल्याचे दिसल्याने अनेक निर्मात्यांनी गोविंदाकडे धाव घेतली. गोविंदानेही बहती गंगा में हात धुवून घेण्याचे ठरवले आणि दोन आठवड्यात या पठ्ठ्याने तब्बल 49 चित्रपट (49 Movies) साईन केले. त्यामुळेच तो एका दिवशी तीन-तीन चित्रपटांचे शूटिंग करायचा. सकाळी एका चित्रपटाचा एक शॉट, दुपारी एक आणि संध्याकाळी एक असे त्याचे शेड्यूल असायचे आणि त्यामुळेच तो सेटवरही उशिरा पोहोचायचा.

ही बातमी पण वाचा : एक रुपयाची किंमत किती? जाणून घ्या या बॉलिवुड स्टार्सकडून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER