शरीरसौष्ठव दाखवल्यानंतर या अभिनेत्याला मिळाला होता चित्रपट

Sonu Sood

एखाद्या अभिनेत्याला त्याचा अभिनय पाहून काम दिले जाते. यासाठी ऑडिशनही घेतले जाते. कधी कधी संवादही बोलण्यास सांगितले जाते. नायिकांना त्यांची फिगर घून काम मिळते हे ऐकले असेल परंतु एखाद्या निर्मात्याने एखाद्या पुरुष अभिनेत्याचे पिळदार शरीर दाखवण्यास सांगून नंतर त्याला काम दिल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? मात्र सोनू सूदच्या (Sonu Sood) जीवनात अशी घटना घडली असून त्याला एका निर्मात्याने पीळदार शरीर दाखवण्यास सांगितले आणि त्यानंतरच त्याला साईन केले.

स्वतः सोनू सूदनेच ही घटना सांगितली होती. सोनूने सांगितले, एका तामिळ चित्रपटासाठी कलाकारांची आवश्यकता असल्याचे मला समजले होते. मी माझा बायोडाटा कास्टिंग डायरेक्टरकडे पाठवला. मला त्यांनी ऑडिशनला बोलावले. खरे तर मला तामिळ येत नव्हते.

माझ्या आईने मला तामिळ शिकण्यासाठी एक पुस्तक दिले होते. ते वाचून मी त्यातील काही शब्द पाठ केले आणि ऑडिशनला गेलो. परंतु तामिळ येत नसल्याने मी नर्व्हस झालो होतो आणि आपल्याला हे काम मिळणार नाही असे मला मनातून वाटत होते. ऑडिशन झाले. त्यानंतर निर्माता आणि दिग्दर्शक माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला टी शर्ट काढण्यास सांगितले. मी व्यायाम करीत असल्याने माझी शरीरयष्टी पिळदार होती. ती त्यांना पाहायची होती. मी टी शर्ट काढले आणि त्यांनी मला चित्रपटात घेतले. अशा तऱ्हेने माझा तामिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER