राममंदिराच्या उभारणीत पंढरपुरातील वारकरी संप्रदायाचा सक्रीय सहभाग

पंढरपूर :  भगवान श्रीराम हे वारकरी संप्रदायाचा प्राण आहे आणि प्रभू श्रीरामाच्या पवित्र जन्मभुमीवर अयोध्येमध्ये भव्य राममंदिर ऊभारण्यात यावे यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येवून राममंदिराच्या ऊभारणीसाठी लढा देण्याची गरज असून रामाच्या भव्य मंदिर कामासाठी पंढरपुरातील सर्व वारकरी सांप्रदाय मंदिर उभारणीच्या कार्यात सक्रीय सहभागी होणार असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपूरे यांनी पंढरपुरात शिवर्तीर्थावर झालेल्या विराट धर्मसभेत बोलताना केले.

भगवान श्रीराम सर्व वारकरी संप्रदाय आणि हिंदूचे आदर्श आहे. अनेक वर्षे श्रीरामाच्या जन्मभुमीतच रामाचे मंदिर होत नाही, अजून किती वर्षे वाट पहायची. आता राममंदिरासाठी सर्व हिंदुंनी एकत्रीतपणे लढा देणे आवश्यक असल्याचे ह.भ.प. बद्रीनाथ महाराज यावेळी म्हणाले.

 ही बातमी पण वाचा : राम मंदिर कधी बांधणार ? ; मोदी सरकारला भाजप खासदारांचा प्रश्न

या धर्मसभेला संबोधीत करताना विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री ॲड.दिपक गायकवाड यांनी आपल्या अत्यंत चाणाक्ष बुद्धीने आणि अभ्यासपुर्ण भाषणातून रामजन्मभुमीचा इतिहास उपस्थितांपुढे मांडला. ते म्हणाले हा केवळ मंदिराचा व दगड विटांचा प्रश्न नाही करोडो हिंदुंच्या अस्मितेचा प्रश्न आहे. रामजन्मभुमीसाठी शेकडो वर्षात 27 लढाया झाल्या परकीय इस्लामी आक्रमकांनी देशातील हिंदुंची श्रध्दास्थाने भ्रष्ट केली त्यामध्ये हजारो मंदिरांचा विध्वंस करण्यात आला.

रामंदिराची लढाई स्वातंत्र्यानंतर गेले 50 वर्षे न्यायालयात चालु आहे. खोदकामात सापडलेल्या अनेक पुराव्या नंतर लखनौ उच्च न्यायालयाने या ठिकाणी मंदिरच असल्याचा एकमुखी निकाल दिल्यानंतर काँग्रेसच्या सिध्दार्थ शंकर राय यांनी काही मुठभर मुस्लीमांच्या वतीने या निकालास न्यायालयात आव्हान दिले व त्यामुळेच आजपर्यत ही लढाई न्यायालयात चालु आहे. ही लढाई परकीय आक्रमकांविरुध्द राष्ट्रीय अस्मितेची आहे. याचा निवडणुकीशी काहीही सबंध नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज असते तर त्यांनी रामंमंदिर निर्माण करण्यास पाठिंबा दिला असता असेही ते म्हणाले.

या धर्मसभेस मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता, तसेच विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री ॲड.दिपक गायकवाड, ह.भ.प. ज्ञानेश्वरमहाराज जाशगदंड, वा.ना.उत्तात, ज्ञानेश्वरमहाराज जळगावकर, रामेश्वरमहाराज वीर, अनिल बडवे, बाबुराव महाराज वाघ, अनुराधाताई शेटे, अॅड माधव मिरासदार यासह अनेक धर्माचार्य व संत उपस्थित होते. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर राममय झाला होता.