
नाशिक : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (All India Marathi Literary Convention ) भरविण्याचा मान नाशिकला मिळाला आहे. येत्या मार्च महिन्यात संमेलन होणार आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी साहित्य संमेलनासंबंधीची महत्त्वपूर्ण घोषणा शुक्रवारी केली. नाशिक येथील लोकहितवादी मंडळाचा प्रस्ताव महामंडळाने मान्य केल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले.
साहित्य संमेलनाच्या यजमानपदावरून दिल्ली आणि नाशिक यांच्यामध्ये चढाओढ सुरू होती. साहित्य महामंडळाकडे नाशिक, दिल्लीसह पुणे, अंमळनेर येथील साहित्य संस्थेनेही साहित्य संमेलन भरविण्यासंबंधी प्रस्ताव पाठविले होते. साहित्य महामंडळाने नाशिक येथील लोकहितवादी मंडळाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. येत्या मार्च महिन्यात संमेलन होणार आहे. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून लोकहितवादी मंडळाची स्थापना १९५० मध्ये झाली आहे. साहित्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रात लोकहितवादी मंडळाचे काम आहे. साहित्य संमेलन भरविण्याचा लोकहितवादी मंडळाचा प्रस्ताव साहित्य महामंडळाने मान्य केल्यानंतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आनंद व्यक्त केला.
मंत्री भुजबळ यांनी, ‘साहित्य क्षेत्राची मोठी परंपरा नाशिक शहराला लाभली आहे. या नगरीने मराठी साहित्य क्षेत्राला दिग्गज साहित्य दिले आहेत. नाशिकमध्ये मार्च महिन्यात होणारे संमेलन ऐतिहासिक होईल यासाठी सगळी मदत करू. संमेलनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये येणाऱ्या साहित्यिकांचा नाशिककरांतर्फे मान-सन्मान ठेवला जाईल.’ अशा भावना व्यक्त केल्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला