८५ वर्षीय संघाच्या कार्यकर्त्याने दुसऱ्या रुग्णासाठी बेड सोडला, तीन दिवसांनी झाले निधन

Narayan Dabhadkar - RSS - Maharashtra Today

‘मी ८५ वर्षाचा झालो आहे. संपूर्ण आयुष्य पाहिलं आहे, पण जर त्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला तर तिची मुलं अनाथ होतील. यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचवणं माझं कर्तव्य आहे’, असं म्हणत संघाचे स्वयंसेवक करोनाबाधित नारायण दाभाडकर (Narayan Dabhadkar) यांनी दुसऱ्या रुग्णासाठी बेड नाकारला. आणि दोनच दिवसात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागपुरात राहणाऱ्या ८५ वर्षीय नारायण दाभाडकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोना (Corona) संसर्ग झाला होता. त्यांची ऑक्सिजन लेव्हल ६० पर्यंत पोहोचली होती. मुलगी आणि जावयाने तिला इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. बऱ्याच वेळानंतर त्यांना बेड मिळाला. त्याचवेळी एक महिला आपल्या ४० वर्षीय पतीला वाचवण्यासाठी बेड शोधत असल्याचं त्यांना समजलं. मात्र बेडअभावी रुग्णालयाने त्यांना दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. रडणाऱ्या महिलेला बघून दाभाडकरांनी थेट डॉक्टरशी चर्चा करुन आपला बेड त्या रूग्णाला देण्याची विनंती केली.मी माझा बेड स्वेच्छेने दुसऱ्या रुग्णासाठी सोडत आहे, असे पत्र त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. दाभाडकर घरी परतले, मात्र तीनच दिवसात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button