सांगलीतील शंभरफुटी रस्ता पुन्हा आकार घेतोय

सांगली : बेसुमार अतक‘मणांमुळे अर्धा होऊन गेलेल्या शंभरफुटी रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला. सतत चर्चेत असलेला आणि छत्रपती शाहू महाराज मार्ग असे नाव दिलेल्या या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी हा रस्ता पूर्णपणे वापरात यावा, म्हणून विशेष लक्ष घातल्याने या रस्त्याला आकार आला आहे.

कोल्हापूरहून येणार्‍या वाहनांना सांगली मार्गे मिरजेला जाणारा प्रमुख बायपास रस्ता म्हणून शंभरफुटी रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु अनेक वर्षे या रस्त्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आजूबाजूच्या गॅरेजधारकांसह इतर व्यावसायिकांचे अतक‘मण बेमालुमपणे वाढत गेले होते. काही काळ तर रस्ता अवघ्या वीस फुटावर आला होता. त्यानंतर वेळोवेळी अतक‘मणे हटविली जायची परंतु ती अतक‘मणे रस्त्याची जागा व्यापून टाकायची. केवळ नावालाच शंभरफुटी रस्ता उरल्याने नागरिकांनी, नगरसेवकांनी , वाहनधारकांनी हा रस्ता पूर्ण रुंदीचा आणि डांबरीकरणाचा असावा, अशी मागणी लावून धरली होती. हा रस्ता वापरात आला तर शहरातील रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याने आयुक्त नितीन कापडणीस यांनी या रस्त्याच्या कामात लक्ष घातले. अवघ्या दोन महिन्यात या कामाला गती दिली आहे. विश्रामबागमधील व्हाईट हाऊस हॉटेल पासून चैतन्य पेट्रोल पंपा पर्यंत पचवर्क तर तेथून पुढे कोल्हापूर रस्त्यापर्यंत डाव्या बाजूने डांबरीकरणाने केला जात आहे. सध्या साई मंदिर ते सिव्हिल हॉस्पीटल कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – धनंजय मुंडे

शंभर फुटीवर अतक‘मण झाल्यास कडक कारवाई : आयुक्त कापडणीस

अनेक वर्षांपासून एकाच बाजूचा रस्ता वापरात असल्याने दुसरी बाजू िअतक‘मणांनी व्यापली होती. आता हा रस्ता डांबरी केला जात आहे. हे काम पूर्ण होताच हा रस्ता सांगली आणि मिरजेला जोडणारा पर्यायी रस्ता म्हणून वापरात येणार आहे. शहरात येणारी अवजड वाहतूकही यामार्गाने मिरजेकडे पाठवणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे रस्ता पूर्ण झाल्यानंतर जर कोणी िअतक‘मण केले तर संबधितांची गय केली जाणार नाही. संबधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.