म्हणून मायक्रोव्हेव शस्त्रांना इतकं खतरनाक मानलं जातं !

microwave weapons - Maharastra Today

भारतीय सैन्यानं चीन विरुद्ध मायक्रोव्हेव हत्यार वापरल्याच्या बातम्या मधल्या काळात प्रसिद्ध झाल्या होत्या. ही बातमी खोटी असल्याचं भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलं. भारत आणि चीनमध्ये गेल्या वर्षी युद्धजन्य परिस्थीती निर्माण झाली होती. ६० हून अधिक जवान दोन्ही देशांना गमवावे लागले होते. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही राष्ट्रांमध्ये वाद सुरुये. लद्दाखच्या पुर्व भागात मागच्या वर्षी झालेल्या झटापटीत मायक्रोव्हेव हत्यारं वापरली गेल्याचा आरोप भारतीय सैन्यानं खोडून काढला होता.

नोव्हेंबरमध्ये आली होती बातमी

हा वाद एका ब्रिटीश वर्तमान पत्रात छापण्यात आलेल्या बातमीमुळं सुरु झाला होता. ही बातमी म्हणते की ‘पॅगॉंग तलावा’नजीकचा भारतीय सैन्याचा ताबा हटवण्यासाठी चीननं २९ ऑगस्टला मायक्रोव्हेव हत्यार वापरलेत. बिजिंगच्या रेनमिन विद्यापीठातल्या आंतराराष्ट्रीय संबंध या विषयाचे प्राध्यापक जिन केनरॉन्ग यांच्या हवाल्यानं ही खबर देण्यात आली होती. ते म्हणाले होते. “या हत्यारांच्या उपयोगानंतर १५ मिनीटातच भारतीय सैन्यानं उलटी करायला सुरुवात केली. त्याना उभ राहणं कठीण जात होतं. त्यामुळं त्यांनी ताबा सोडला. अशा प्रकारे आम्ही आमचा प्रदेश मिळवला. या गोष्टीला आम्ही बाहेर येऊ दिलं नाही कारण यामुळं पुन्हा नवा वाद निर्माण झाला असता. भारत देखील या गोष्टीला नकार देईल कारण त्यांचा आम्ही पराभव केलाय हे त्यांना मान्य करायचं नाहीये.”

इतके खतरकनाक का असता मायक्रोव्हेव हत्यारं

‘डायरेक्ट एनर्जी वेपन’ (डीईडब्लू) श्रेणीत या हत्यारांचा समावेश होतो. या हत्यारांमधून उर्जा प्रभावित करण्यासाठी सोनिक, लेजर आणि इतर मायक्रो तरंगाचा वापर करण्यात येतो. या तरंगांवर गृहृत्वाकर्षणाचा प्रभाव कमी असल्यामुळं ही हत्यारं लांब पल्ल्यावर सटीक मारा करु शकतात. परंपरागत हत्यारांपेक्षा दहा पट प्रभावी ही हत्यार असल्याचं मानलं जातं.

द टाइम्स या वृत्त पत्रानं दिललेल्या बातमीनूसार चीननं लदाख खोऱ्यात हाय फ्रिक्वेंसीच्या तरंगांचा वापर केलाय. या हत्यारानं मारा केल्यास यातून उत्सर्जीत होणारे तरंग त्वचेखाली असणाऱ्या पेशींमधील पाण्याशी टक्कर घेतात आणि पाण्याचं तापमान वाढवायला मदत करतात. हे तरंग मायक्रोओव्हनमध्ये ही वापले जातात. यातून तयार होणारी इलेक्ट्रोमॅग्नेटीक तरंग जेवण गरम करतात. यामुळं जेवण गरम केलं जातं किंवा तापवण्यास मदत केली जाते. यामुळं ज्या पदार्थात पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यांना शिजवण्यास याची मदत होते.

इतिहास

कधीकाळी विज्ञानकथेत अशा हत्यारांचा उल्लेख व्हायचा आज ही हत्यारं वास्तव बनलीयेत. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात अशा हत्यारांवर संशोधन व्हायला सुरुवात झाली. १९३० मध्ये रडारचा शोध लावण्यात आलेलं यश या प्रवसातला महत्त्वाचा टप्पा होता. यानंतर सैन्यक्षेत्रांमध्ये रडार यंत्रणा वेगानं उभारली गेली. मायक्रोव्हेव हत्यारांनाच युद्धाचं भविष्य मानलं जातं. २०१४ ला चीनन पहिल्यांदा डब्लूबी-१ नावाचं मायक्रोव्हेव हत्यार प्रदर्शित केलं होतं. अमेरिकेनं सुद्धा अशा प्रकारची हत्यारं शोधून काढलीयेत याला त्यांनी ‘अॅक्टीव्ह डिनायल सिस्टीम’ असं नाव दिलंय. ही हत्यार अफगाणिस्तानात तैनात सैन्याच्या हातात देण्यात आली पण यांचा कधीच वापर करण्यात आला नसल्याचं बोललं जातंय.

२०१७ ला बातमी आली होती की क्यूबाच्या हवानामध्ये अमेरिकी दुतावासावरील कर्मचाऱ्यांवर अशा पद्धतीच्या हत्यारांचा वापर करुन हल्ला करण्यात आला होता. चीनच्या गुआंजूमधली अमेरिकेच्या व्यापार दुतावासावर ही असा हल्ला झालो होता. या घटनेत जवळपास ४० अमेरिकेच्या नागरिकांना निशाणा बनवण्यात आलं होतं. सर्वांना कर्कश्य आवाज ऐकू आला. नंतर डोकेदुखी, उलटी, थकवा आणि चक्कर येणे झोप न येणे अशा समस्यांना नंतर तोंड द्यावं लागलं होतं.

तज्ञ सांगतात

भारताविरुद्ध चीननं अशा प्रकारच्या हल्ल्यांचा वापर केल्यास भारत शांत राहणार नाही असं सांगण्यात येतंय. दोन्ही देशात सुरु असलेल्या संघर्षाला वेगळ वळण लागलं असतं. या सैनिकी झटापटीनंतरही दोन्ही देश चर्चतून मार्ग काढण्यावर सकारात्मक आहेत. त्यामुळं अशा प्रकारचा हल्ला झाला नसल्याचं सुरक्षा विषयातले तज्ञ म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button