म्हणून मुलांना आली पाहिजे त्यांची मातृभाषा

आजकाल सर्वांना इंग्रजी भाषेचा जणू काही मोहच लागला आहे. अगदी लहानमुलांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच प्रिय वाटू लागली आहे इंग्रजी भाषा. यात पालक तर आपल्या मुलांना इंग्रजी बोलता यावा म्हणून त्यांना इंग्रजी शाळे मध्ये घालतात. तसं पाहिले तर इंग्रजी ही भाषा येणे देखील तेवढेच गरजेचे आहे. परंतु ते बोलता आलेच पाहिजे हा अट्टहास करणे मात्र चुकीचे आहे. यावर एक शोध करण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : बहिणीच्या सहवासात असणाऱ्या भावांमध्ये ‘या’ गोष्टी असतात खास

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये झालेल्या शोधात असे समोर आले आहे की, जी मुले घरी आपल्या मातृभाषेत संवाद साधतात ती अधिक बुद्धिवान असतात. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ रिडींगचे संशोधन आणि असोसिएट प्रोफेसर मायकल डायर म्हणतात की, जी मुले घरी मातृभाषेत आणि शाळेत वेगळ्या भाषेत बोलतात ते मातृभाषेत न बोलणाऱ्या मुलांच्या तुलनेत अधिक बुद्धिमान असतात. यासाठी त्यांच्या टीमने ७-११ वर्षांच्या १०० तुर्की मुलांवर हा प्रयोग केला. त्यातून असे सिद्ध झाले की, मातृभाषेत बोलणाऱ्या मुलांचा आयक्यू फक्त इंग्रजी बोलणाऱ्या मुलांच्या तुलनेत उत्तम होता.

ही बातमी पण वाचा : आपल्या मुलांना यशस्वी बनविण्यासाठी ‘हे’ गुण अवश्य शिकवा