मिलिंद सोमणला पहिल्यांदा मॉडेलिंगसाठी मिळाले इतके पैसे; एका तासाचे मानधन बघून स्वतःच आश्चर्यचकित

Milind Soman

अभिनेता मिलिंद सोमण  (Milind Soman) आपल्या फिटनेस आणि फोटोंमुळे चर्चेत राहतो. त्याने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. मिलिंदला आता त्याचे डेलिंगचे दिवस आठवले. मिलिंदने आपल्या पहिल्या मॉडेलिंगचे दोन फोटो शेअर केले आहेत, जे त्याने ३१ वर्षांपूर्वी शूट केले होते. यासोबतच त्याने मॉडेलिंगबद्दलचा अनुभवही शेअर केला आहे.

या फोटोंमध्ये मिलिंद बर्‍यापैकी तरुण दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “माझी पहिली जाहिरात मोहीम १९८९ (My First Advertisement Campaign 1989). या मोहिमेपूर्वी मला माहीत  नव्हते की, मॉडेलिंग हा एक व्यवसाय आहे. मला एका व्यक्तीने फोन केला, ज्यांनी मला कुठे तरी बघितले असेल. त्यांनी मला काही फोटो काढायला सांगितले. त्यावेळी मी लाजाळू मुलगा होतो आणि या शूटसाठी मी उत्सुकही नव्हतो. पण जेव्हा त्याने मला एका तासासाठी ५० हजार रुपयांची ऑफर दिली तेव्हा मी हो म्हणालो. धन्यवाद रसना बहल. ”

मॉडेलिंगमध्ये यश मिळाल्यानंतर मिलिंद सोमण  अभिनयाकडे वळला. मिलिंदने अभिनय जीवनाची सुरुवात सी हॉक्स आणि कॅप्टन व्योम यासारख्या कार्यक्रमातून केली. याव्यतिरिक्त त्याने प्यार का सुपरहिट फॉर्म्युला, जर्म, १६ डिसेंबर, बाजीराव मस्तानी आणि शेफ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आजकाल मिलिंद त्याच्या ‘पौरुषपूर’ या वेब सिरीजबद्दल चर्चेत आहे. यात तो योद्ध्याच्या (Warrior) भूमिकेत दिसणार आहे, ज्याचे नाव बोरिस आहे. ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर अल्ट बालाजीवर रिलीज होणार आहे. वेब सिरीजमध्ये तो पहिल्यांदा ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. मिलिंदशिवाय अनु कपूर आणि शिल्पा शिंदे यासारख्या कलाकारांनीही ‘पौरुषपूर’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER