असं ढासळलं ब्लॅकबेरीचं साम्राज्य…

That how BlackBerry empire collapsed

स्मार्ट फोन बाजारात यायच्या आधी छोट्या छोट्या गोष्टींसाठी संगणकाची गरज लागायची. इमेल पाठवण्यासारखी किरकोळ कामं देखील संगणकावर करायला लागयची. पण ब्लॅकबेरीचे मोबाईल्स बाजारात आले आणि त्यांनी सारं चित्रच पालटलं.

कॉरपोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी तेव्हा ब्लॅकबेरी वरदानासारखा होता. या फोनमुळं त्यांच आयुष्य सुखकर झालं होतं. बदलत्या वेळेत ब्लॅकबेरीनं फोनमध्ये बदल केले. कधीकाळी ही कंपनी मोबाईल्सच्या जगात शिखरावर होती. पण आता ब्लॅकबेरी स्पर्धेतून बाहेर फेकला गेलाय. असं का झालं?

ईमेल सुविधेमुळं मोबाईल जगतात क्रांती झाली

१९९० ते २००० च्या मध्ये अनेक मोठ्या कंपन्या वायरलेस फोन बनवण्यासाठी संशोधक करत होत्या. परदेशात इंटनेच जाळं विणायला सुरुवात झाली होती. त्यावेळी इंटनेटची सेवा प्रचंड महाग होती. त्यामुळं फक्त कॉलिंगची सुविधा देता येईल अशा स्वरुपाचे फोन बनवण्यात येत होते.

तर दुसऱ्या बाजूला ब्लॅकबेरी बाजाराला इंटरनेटशी जोडू पाहत होता. यासाठी ते असा फोन बनवण्याच्या तयारीत होते जो लहान सहान तुकड्यात डेटा पुढं पाठवू शकत असेल. संपूर्ण बाजाराच्या उलट्या दिशेनं विचार करणाऱ्या ब्लॅकबेरीवर डबघाईची वेळ येईल अशी चर्चा होती मात्र याच बाजूने विचार करत ब्लॅकबेरीनं स्वतःच्या नावाचं साम्राज्य निर्माण केलं.

काही वर्षांच्या मेहनतीनंतर २००० साली ब्लॅकबेरीनं पहिला फोन लॉंच केला. RIM 957. या फोनकडून कोणालाच काही विशेष अपेक्षा नव्हत्या पण लॉंच झाल्याच्या दिवसापासून या फोननं मोबाईल क्षेत्रात क्रांती आणली. ई मेलसह काही सुविधा, क्वेरट कीपॅड आणि छोटी स्क्रीनवाल्या या फोननं मार्केटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. विशेष म्हणजे या फोनवरुन इमेल पाठवणं सहज शक्य होतं. ईमेलशी सर्वात आधी जोडेल्या गेलेल्या या कंपनीनं बाजारातल्या इतर कंपन्यापेक्षा दहा वर्ष पुढची टेक्नोलॉजी बाजारात आणली होती. इथून ब्लॅकबेरीनं यश शिखरं चढायला सुरुवात केली.

भारतीय बाजारपेठा घेतल्या ताब्यात

पहिल्या फोनच्या यशानंतर कंपनीने अधिक चांगल्या फिचर्ससह फोन बाजारात आणले. अधिक ग्राहकांना खेचण्यासाठी अधिक चांगले फिचर्स फोनमध्ये असायला हवेत याचं भान कंपनीला होतं म्हणून त्यांनी एकानंतर एक असे फिचर्स फोन बाजारात आणले ज्याने फोनचा स्मार्ट फोनपर्यंतचा प्रवास सुरु झाला.

ईमेलच्या फोनमध्ये कॉलिंग सिस्टीम दिली. कॉलिंगच्या फोनला हेडफोन सिस्टीम आणि नंतरच्या काळात पहिला कलर स्क्रीनफोन ब्लॅक बेरीनं लॉंच केला. नोकीयाने पाय जमवलेल्या भारतीय बाजारापेठेत ब्लॅकबेरीची एँट्री झाली. टेलिकॉम कंपनी एअरटेलशी डील करत ब्लॅकबेरी भारतात आली. एअरटेसोबत मिळून ब्लॅकबेरीनं भारतात नवे मॉडेल्स लॉंच केले.

ब्लॅकबेरीला भारतीय बाजारपेठेत प्रचंड पसंती मिळाली बिझनेस क्लासवाल्या लोकांसाठी ब्लॅकबेरी वापरणं प्रतिष्ठेचा विषय बनला. यानंतर ब्लॅकबेरीनं मागं वळून पाहिलं नाही. कंपनीच्या नफ्यात जबरदस्त वाढ होत होती.

…वेळेची गती पकडता आली नाही

मोबाईल विक्रीत ब्लॅकबेरी अव्वल स्थानावर होती. प्रतिवर्ष लाखो फोन्स विकले जात होते. परंतू वर्षभर ब्लॅकबेरी एकाच डिझायनवर काम करत होती. नाविन्याचा शोध घेणं कंपनीनं थांबवलं होतं.

वर्ष २००७. फोन मार्केट पुन्हा बदलाच्या टोकावर होतं. ब्लॅकबेरीला याची खबर नव्हती. कॉंम्प्यूटरच्या जगात क्रांती करणारं अॅप्पल फोन मार्केटमध्ये उतरु पाहत होतं. आणि स्कीनटचची सुविधा असणारा आयफोन लॉंच झाला.

आयफोनची बाजारात एँट्री झाली आणि सारंच काही बदललं. ब्लॅकबेरीच्या साम्राज्याला हदरे बसायला सुरुवात झाली. ब्लॅकबेरी ज्या कॉरपोरेट कर्मचारी आणि बिझनेस क्लासच्या भरवशावर चालायची त्यांनी ब्लॅकबेरी सोडून आयफोनला पसंदी दिली. दिवसेंदिवस ब्लॅकबेरी नुकसानीला सामोरी जात होती आणि एकदिवस पसारा आवरण्याची त्यांच्यावर वेळी आली.

लुक्स आणि फिचर्स दोन्ही आघाड्यांवर आयफोन ब्लॅकबेरीच्या पुढं होता. अॅप्स यायला सुरुवात झाली. याच काळात बाजारात अँड्रोइड फोन्सने धुमाकुळ घातला. आयफोनच्या तुलनेत हे प्रचंड स्वस्त होते. ब्लॅकबेरीची दुहेरी पंचायत झाली. फिचर्स नसतानाही आयोफोनच्या तुलनेत त्यांचे फोन विकले जायचे दुसरीकडे स्वस्त अँड्रोइड फोन्सनी बाजार काबीज केला.

२०१५ला ब्लॅकबेरीनं स्मार्टफोन न बनवण्याची घोषणा केली. त्यानंतर कंपनी दुसऱ्या गुंतवणूकदारांना विकण्यात आली. दोन वर्षापूर्वीपासून ब्लॅकबेरी अँड्रोइड ऑपरेटींग सिस्टीम घेवून बाजारात आली पण त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER