माझ्या तोंडी ते वक्तव्य टाकण्यात आलं ; गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण

Anil Deshmukh

मुंबई :  काही पोलीस अधिकारी (Police officers) सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत या वक्तव्यावर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh0 यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते विधान निराधार असल्याचा खुलासा त्यांनी केला.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, “लोकमत वृत्तपत्रानं माझं वक्तव्य म्हणून जी बातमी छापली, ती निराधार आहे. माझ्या तोंडामध्ये तसं व्यक्तव्य टाकण्यात आलं आहे. मी असं कुठेही बोललेलो नाही. जर आपण यासंदर्भातील युट्यूबर असलेला माझा व्हिडिओ पाहिला तर आपल्याला वस्तुस्थिती लक्षात येईल.” असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिले.

काय होते ते वक्तव्य –

चार ते पाच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते. त्यात एका अतिवरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश होता. मात्र, हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळले गेले, असं गृहमंत्री देशमुख बोलल्याचं वृत्त लोकमतला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं.

दरम्यान, शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर या प्रकरणावर पडदा पडला असल्याचेही बोलले जात आहे.

ही बातमी पण वाचा : काही आयपीएस अधिकाऱ्यांनी ‘ठाकरे’ सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; गृहमंत्री देशमुखांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER