मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरींचा तो फोटो व्हायरल ; उलट- सुलट चर्चाना विधान

Uddhav Thackeray - Nitin Gadkari

मुंबई :- भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात काल बैठक झाली आहे. या बैठकीतला उद्धव ठाकरे-नितीन गडकरींचा एक फोटो व्हायरल होतोय. उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी बैठकीदरम्यान एका विषयावर चर्चा करताना मग्न झालेले दिसून येत आहेत.

राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनविषयक तसेच विविध परवान्यांसदर्भात मुख्यमंत्री-गडकरी यांच्यात विशेष बैठक पार पडली. या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मुख्य सचिव संजय कुमार (Sanjay Kumar) आदी उपस्थित होते.

गडकरींशी बैठक संपताच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी या प्रकल्पांच्या भूसंपादनासंबंधीच्या समस्या व वन विभागाच्या परवान्यांतील अडचणी तातडीने दूर कराव्यात, असा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर गडकरी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाविषयी माहिती दिली. राज्यात 5500 कोटींची कामे महाराष्ट्रात मंजूर झाली आहेत, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली. गेल्या मार्च महिन्यात राष्ट्रीय महामार्गाबाबत आढावा घेतला आहे. आता मोठ्या गॅप नंतर आता पुन्हा एकदा आढावा घेतल्याचंही गडकरींनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडचणी दूर होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री गडकरी यांची बैठक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER