तो फोटो विरुष्काच्या कन्येचा नाहीच!

Virat Kohli - Anushka Sharma Baby Girl

सेलिब्रेटींच्या प्रत्येक गोष्टीबद्दल लोकांना फार उत्सुकता असते. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात काहीही घडले तरी त्याची चर्चा होत असते. विराट कोहली (Virat Kohli) व अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्याबद्दलही असंच घडलंय. त्यांच्याकडे बाळ येणार या आॕगस्टमधील पहिल्या व्टिटपासून ते 11 जानेवारीला कन्येचे आगमन होईपर्यंत आणि त्यानंतरही विरुष्का चर्चेत आहेत.

लोकांना एवढी त्यांच्या बाळाची झलक पाहण्याची उत्सुकता की विराटचा भाऊ विकासने या जोडप्याच्या अभिनंदनासाठीच्या संदेशात सोशल मीडियावर एक फोटो काय टाकला, लोकांना वाटले की खरोखरच हा विरुष्काच्या बेबीचा फोटो आहे. मग तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला. लोकांना वाटले हा खरोखरच त्या बेबीचा फोटो आहे. आता विकास कोहलीच्या खुलाशानंतर हे स्पष्ट झालेय की, तो फोटो विरुष्काच्या बेबीचा नव्हताच मुळी!

विकासने म्हटलेय की, इन्स्टाग्रामवर त्याने पोस्ट केलेला फोटो हा त्या बेबीचा नव्हताच मुळी…तो तर त्याने असाच संग्रहीत फोटो टाकला होता. विकासने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, आनंद ओसंडून वाहातोय, घरी परीचे आगमन झालेय.

विराट आणि अनुष्काने अद्याप आपल्या बेबीचा फोटो जारी केलेला नाही. त्यांनी कृपया आमचे खासगीपण जपा असे आवाहन चाहत्यांना केले आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER