‘ते’ छायाचित्र नेताजींचेच, केंद्राचे स्पष्टीकरण

'That' photo is Netaji's, Centre's explanation!

दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांच्या १२५ व्या जयंती निमित्त शनिवारी (२३ जानेवारी) रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात नेताजींच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. ते छायाचित्र नेताजींचे नसून त्यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे आहे, असा आक्षेप घेऊन सोशल मीडियावर, सरकारवर टीका करणाऱ्या उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. त्यावर केंद्र सरकारतर्फे स्पष्टीकरण देण्यात आले – नेताजींचे हे चित्र त्यांच्या खऱ्या फोटोवरुनच काढण्यात आले आहे.

राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या या चित्रातील नेताजी खरे नसून अभिनेता प्रसूनजित चॅटर्जी (Prasunjit Chatterjee) असल्याचा दावा अनेकांनी केला. प्रसूनजित यांनी श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित ‘गुमनामी’ नावाच्या बंगली चित्रपटामध्ये नेताजींची भूमिका केली होती. ‘तो’ फोटो याच चित्रपटातील नेताजींच्या भूमिकेतील प्रसूनजित यांचा आहे, असा आरोपस्वरूप दावा करण्यात आला होता. हा वाद खोट्या माहितीच्या आधारे सुरू आहे. ही माहिती कोणतेही संशोधन न करता पसवण्यात आली आहे, असेही सरकारने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER