त्यावरून आमची ही बैठक उपयुक्त ठरली; आनंद महिंद्रांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

Maharashtra Today

मुंबई : राज्यातील कोरोनाची भीषण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने बैठका घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यममंत्र्यांनी राज्यातील उद्योगपतींसोबत बैठक घेतली. या बैठकीत देशातील प्रमुख उद्योजक आणि महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra)यांनी विशेष मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. तसेच महिंद्रा यांनी लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील उद्योगपतींसोबत कोरोनासंदर्भात व्हर्च्युअल बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जनतेला आणि उद्योगधंद्यांना फटका बसू नये, यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा सांगितला. तसेच, लसीकरणाबाबत उद्योगपतींशी चर्चा केली. या कामाचे आनंद महिंद्रा यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. सीएमओने केलेल्या ट्विटला आनंद महिंद्रा यांनी रिट्विट केले.

“ज्या पद्धतीने बैठक झाली त्यावरून आमची ही बैठक उपयुक्त झाली असं वाटतं. कारण…
अ ) औपचारिक किंवा शिष्टाचारी वक्तव्यांमध्ये वेळ वाया घालवला नाही.
ब) बैठकीत अजेंडा हा केंद्रस्थानी होता.
क) कोरोना परिस्थितीचे वास्तव लक्षात घेऊन सरकार व कॉर्पोरेटद्वारे करत असलेल्या प्रयत्नांवर जोर दिला गेला.
ड) याशिवाय पूर्ण मोहिमेच्या पाठपुरावा व समन्वयासाठी व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला, असे कौतुकास्पद ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.

उद्धव ठाकरेंचे उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. लॉकडाऊनबाबत वक्तव्य करणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला. यात एका उद्योगपतीच्या वक्तव्यालाही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले. या उद्योगपतीने लॉकडाऊन करण्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला दिला होता. आरोग्य सुविधा वाढवल्याच आहेत,पण केवळ आरोग्य सुविधा वाढवून चालणार नाही, तर त्यासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांची गरज आहे. आरोग्य सुविधा हाताळण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासते. त्यांचा पुरवठा हे उद्योगपती करणार का? अशा प्रकारची वक्तव्ये न करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button