‘…म्हणूनच मंदिराचे दार उघडले!’ नितेश राणेंचा ठाकरे सरकारला टोला

Cm Thackeray-Nitesh Rane

मुंबई :- राज्यातील मंदिरं पाडव्यापासून (सोमवार) उघडण्यास अखेर राज्य शासनाने आज परवानगी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून हा निर्णय आज जाहीर करण्यात आला. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं’ची इच्छा समजा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट केले आहे. भाजपनी सरकारचे डोळे उघडले… म्हणूनच मंदिराचे दार उघडले!! सगळ्यांचे अभिनंदन…” असे म्हणत नितेश राणे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) व भाजपा महाराष्ट्रला टॅग केले आहे.

दरम्यान, अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरं मात्र उघडण्यास आतापर्यंत परवानगी देण्यात आली नव्हती. या मुद्यावरून भाजपाने आक्रमक धोरण स्वीकारले होते; शिवाय, वारकरी संप्रदायामध्येही सरकारबद्दल नाराजी वाढत होती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरू झाल्याने राज्यातील मंदिरंही खुली करावीत, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

ही बातमी पण वाचा : हे असतील धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश, दर्शनाबाबतचे नियम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER