म्हणून भारतात पॉर्न फिल्म्स ‘ब्लू फिल्म’ म्हणून ओळखल्या जातात!

Porn - Maharastra Today

भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश आणि दक्षिण आशियात पॉर्नचा उल्लेख नेहमी ‘ब्लू फिल्म’ असा केला जातो. पण या शब्दाचा न पॉर्नशी काही संबंध नाही. तरी या फिल्मसना ब्लू फिल्म का म्हणलं जातं हा सवाल तुमच्या मनात आला असले.

हे आहे कारण

सर्वात पहिला जो पॉर्न सिनेमा बनला त्याच टायटल ‘ब्लू’ होतं. त्यामुळं कालओघात पॉर्न सिनेमाच नाव ब्लू फिल्म झालं, असं मानलं जातं. काही लोकांच्या मते हे तथ्य नाही. याला दुसरी बाजू असल्याचं ही सांगितलं जातं.

पोस्टर्स आहेत प्रमुख कारण

आकाशी निळ्यचा रंगामध्ये पॉर्न सिनेमांचे पोस्टर आधी प्रदर्शित केले जायचे. त्यामुळं पॉर्न सिनेमांना ‘ब्लू फिल्म’ असं संबोधलं जाऊ लागलं. हा रंग देण्यामागं विशेष कारण होतं. आधी अनेक सिनेमांचे पोस्टर्स लागायचे. त्यात वेगळ्यापणानं हे पोस्टर दिसावं. प्रेक्षकांच ध्यान पोस्टरनं लगेच आकर्षित कराव म्हणून पॉर्न फिल्मचे पोस्टर निळ्या रंगात रंगवले जायचे. त्यावरुनच नाव ब्लू फिल्म असं पडलं.

निळ्या आवरणात आधी फिल्म ठेवली जायची

सिमेमांचे वर्गीकरण करताना सिनेमाच्या आशयानूसार त्याच्यावर आवरण चढवले जात. आधी टॉकीजमध्ये रिल्स असायच्या. त्या खराब होऊ नयेत म्हणून त्यावर आवरण चढवले जायचे. पुढं जाऊन सीडी आणि डिव्हीडीज आल्या. त्याच्यावर सुद्धा आवरण असायचे. पॉर्न सिनेमा ज्याही रिल अथवा सिडीत असायचा त्याचे आवरण निळ्या रंगाचे असायचं. त्यामुळं सुद्धा पॉर्न सिनेमांना ब्लु फिल्म म्हणायचा प्रघात पडल्याचं बोललं जातं.

निळा कायदा

ब्लू फिल्मच्या नावाचा इतिहास एका शतकापुर्वी युरोपात असलेल्या कठोर कायद्यावरुन आपल्यापर्यंत पोहचतो. त्यावेळी युरोपात ‘ब्लू लॉ’ म्हणजेच निळा कायदा होता. हा एक धार्मिक कायदा होता. चर्चच्या आदेशानूसार काही मोजक्या वस्तूंच्या व्यापारावर, नाच गाणी, इत्यादी गोष्टींवर बंदी होती. शंभर वर्षापूर्वी भारतात इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज अधिकारी हा कायदा पाळत. त्यामुळं त्यांनी रविवारच्या दिवशी असे सिनेमा पाहू नयेत असे निर्बंध लागू केले होते त्यामुळं भारतात पॉर्न फिल्मला ‘ब्लू फिल्म’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

भारतात आहे ब्लू फिल्समवर बंदी

इंटरनेटच्या अनियंत्रित वापरामुळे किशोर वयीन आणि अगदी लहान मुलांच्या हाती हे लागते, आणि ही मोठ्या चिंतेची बाब आहे. २०१६ मध्ये भारतामध्ये अश्या साईट्स वर प्रतिबंध घालण्यात आला होता, पण जनतेच्या व्यापक विरोधामुळे हा प्रतिबंध सरकारला मागे घ्यावा लागला. भारतात काही इंटरनेट प्रोव्हायडर्स आपल्या खाजगी क्षमतेत पॉर्न वर प्रतिबंध घालतात, जसे कि रिलायन्स जिओ वर बऱ्याच प्रसिद्ध पॉर्न साईट्स ऍक्सेसिबल नाहीत. सरकार किंवा इंटरनेट प्रोव्हायडर्स ने कितीही प्रतिबंध टाकले तरी शौकीन लोक काही ब्लॅक हॅट पद्धती वापरून पॉर्न पाहतातच.

पॉर्न पाहणं बनू शकतं व्यसन

भारतात ब्लू फिल्म्स मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात. त्याचे अनेक दुष्परिणामही दिसून आलेत. यामुळं अनेकांचे संसार उध्वस्त झालेत. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांना पॉर्न पाहण्याची सवय उत्तेजन देऊ शकते. व्यक्तींवर किंवा त्यांच्या लैंगिक संबंधांवर पॉर्न चे दुष्परिणाम वापरल्या जाणार्‍या पोर्नोग्राफीच्या प्रकारावर अवलंबून असतात आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये ते भिन्न असू शकतात. काही रिसर्च असे सूचित करतात की पॉर्न फोटोस आणि व्हिडिओस व्यसन बनू शकतात, विशेषत: जेव्हा ते हस्तमैथुन करताना पाहिले जातात. पण काहीजण असे मानतात की हा रिसर्च डेटा अपूर्ण आहे. इतर संशोधनात अशी अश्लील सामग्री लैंगिक हिंसाचाराशी हि जोडली गेली आहे. त्यामुळं पॉर्न जास्त वेळ पाहू नये असा सल्ला मनोविकार तज्ञ देतात.

यामुळं गंभीर प्रकरण घडत असल्याचं अनेकदा समोर आलंय. पॉर्न व्हिडिओतील चित्र विचित्र पोसिशन्स, क्रियांमुळे पाहणारांच्या आपल्या पार्टनर कडून सुद्धा तश्याच अपेक्षा असतात, त्या पूर्ण न झाल्यास त्यांच्या लैंगिक संबंधात तसेच नात्यावर परिणाम होऊ शकतो. याविषयीची रिसर्च करणे कठीण आहे, कारण पॉर्न पाहणे ही अत्यंत खाजगी गोष्ट आहे, काही देशांत या वर बोलणे सुद्धा निषिद्ध आहे. तसेच काही बी ग्रेड चित्रपट सुद्धा सॉफ्ट पॉर्न दाखवतात, अश्या सर्व मुद्द्यांमुळे याच्या परिणामांवर निर्णायक निकाल काढणे खूप कठीण आहे. यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असल्याचेही चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER