परमबीर सिंह यांच्या पत्रातली ‘ती’ तारीख चूक ?

Maharashtra Today

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ‘वसुलीच्या टार्गेट’चे आरोप केले आहेत. यासंदर्भात सचिन वाझे यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची भेट घेतल्याचे म्हटले आहे. मात्र, सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची त्यांनी नमूद केलेली तारीख संशय निर्माण करणारी आहे.

परमबीर सिंह यांच्या पत्रानुसार, अनिल देशमुख यांनी वाझेंना मुंबईतील ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्यावर भेटायला बोलावले होते. मात्र, ज्या दिवशी वाझे आणि देशमुख यांची भेट झाल्याचा दावा परमबीर यांनी केला आहे त्या दिवशी अनिल देशमुख नागपूरमध्ये कोरोनावर उपचार घेत होते. रुग्णालयाच्या कागदपत्रांतून हे उघड होते.

अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांचे आरोप आधीच फेटाळले आहेत. ‘सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. शिवाय, परमबीर सिंग यांनी आरोप सिद्ध करावेत, असे आव्हान अनिल देशमुख यांनी दिले आहे. त्यात आता हा तारखेचा मुद्दा निघाला आहे.

ही बातमी पण वाचा : परमबीर सिंहांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर काँग्रेस हायकमांड ‘अ‍ॅक्टिव्ह’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER