कोरोनाचा सामना करण्यासाठी ठाणेकर प्रशासनाला साथ देत नाही – नरेश म्हस्के

प्रशासनाला सहकार्य करा महापौरांचे आवाहन

ठाणे :- ठाणे शहराच्या विकासामध्ये आजपर्यंत ठाण्यातील तमाम नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच सहकार्य या कोरोनाच्या युद्धामध्ये आम्हाला आपले हवे आहे. पण दुर्दैवाने म्हणावेसे वाटते, या युद्धामध्ये ठाणेकर म्हणावे तसे अजूनही सहकार्य करत नाही. ठाण्यातील मुंब्रा, कळवा वागळे इस्टेट असे कितीतरी भाग आहेत या भागात टाळेबंदीचे नियम काटेकोरपणो नागरीक पाळत नाहीत. रस्त्यावर फिरत आहेत, कोणत्यातरी शुल्लक कारणास्तव सुशिक्षित नागरिक देखील रस्त्यावर दिसत आहेत. कधी आले, लिंबू आणण्याचे कारण, तर कधी फिरण्याच्या हेतुने मेडिकल मधून फेअर अँड लवली घेवून बाहेर पडतात, यातून दुर्दैवाने टाळेबंदीची शिस्त मोडते आहे. हे सगळं करून काय साध्य होणार आहे बाबांनो? तर आपल्या मरणाला आपणच आमंत्रण देत आहोत. त्यामुळे आता तरी सावध व्हा आणि प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांना केले आहे.

ठाणे शहरातील माङया भावा बहिणींनो, माङया बांधवांनो, मातांनो, माङया तमाम ठाणेकरांनो. मी अत्यंत नम्रपणो, आपल्याला दोन्ही हात जोडून विनंती करतो आहे, कृपया टाळेबंदीचे नियम काटेकोरपणो पाळा. ठाणे शहर हे मुंबईच्या हद्दीवर आहे, मुंबईत जसा कोरोनाचा प्रसार वाढतो आहे, तसाच ठाणे शहरातही आता वाढू लागला आहे. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होवू लागला आहे. महापालिकेने दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन न केल्यामुळे कोरोनाच कम्युनिटी स्प्रेड होवू लागला आहे. जर अजूनही अशीच बेफिकीरी तुम्ही दाखवली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. तुमच्या सेवेसाठी डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी, ठाणे महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी हे अहोरात्र स्वत:चा जीव धोक्यात घालून ते काम करीत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस स्वत:च्या परिवारापासून दूर राहून सेवा देत आहेत, त्यांना सहकार्य करणो गरजेचे आहे, ती सुद्धा माणसे आहेत, त्यांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, ते ही कधीतरी थकू शकतात, मग तुम्ही काय करणार आहात? आज कम्युनिटी स्प्रेडच्या स्टेजला आपण आहोत म्हणून आता खरी जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

राज्यातील परिस्थिती नियत्नंणात आणण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब हे सर्व यंत्नणासमवेत काम करीत आहेत, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मी स्वत: आणि सर्व लोकप्रतिनिधी आपल्या ठाणे शहरातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या कामात जातीने लक्ष घालून दिवस-रात्र ठाणोकरांसाठी काम करीत आहोत. ठाण्यात कोरोना आटोक्यात यावा म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहोत आणि दुसरीकडे कोथिंबिरीची जुडी संपली म्हणून खुशाल बाजारपेठेत गर्दी करणारे ठाणेकर ही पाहायला मिळत आहेत. काही दिवस नुसते कडधान्य खाल्ले तर कुठे काय बिघडते? सध्या आपल्या हातात पर्याय नाही. थोडी कळ काढा, शिस्त कडक पाळा. पुन्हा तोंडावर पावसाळा आहे, पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. जर पावसाळ्यापूर्वी कोरोनाचा हा प्रादुर्भाव आपण रोखू शकलो नाही तर आणखीन भयंकर स्थिती निर्माण होऊ शकते.

त्यामुळे पालिकेने दिलेले नियम शिस्तीने पाळा, आपल्याला फक्त एवढेच करायचा आहे, की घराबाहेर पडू नका. या ठाणे शहरासाठी तुम्ही जबाबदार नागरिक म्हणून, या महाराष्ट्रासाठी तुम्ही जबाबदार नागरिक म्हणून आणि या देशासाठी तुम्ही जबाबदार नागरिक म्हणून फक्त आणि फक्त एकच गोष्ट करा, स्वत:च्या घरी रहा, बाहेर पडू नका आणि आपला जीव वाचवा. ठाण्याचा प्रथम नागरिक या नात्याने मी पुन्हा एकदा आपल्याला अत्यंत नम्रपणो हात जोडून विनंती करतो आहे, की आपल्या मरणाला आपणच हाक मारून बोलवू नका! घराबाहेर पडू नका! आरोग्याची काळजी घ्या, स्वच्छता राखा, बाजारपेठांमध्ये गर्दी करू नका, नाक्यानाक्यावर एकत्र जमू नका, तुम्ही फक्त घरी राहा, या युद्धात आम्ही, आमची महापालिकेची यंत्रणा, पोलीस यंत्रणा, सगळे सैनिकांसारखे काम करत आहोत, तुम्ही फक्त घरी राहून आम्हाला लढ म्हणा! एवढेच हात जोडून पुन्हा पुन्हा तुम्हाला मी सांगतो आहे.


Web Title : Thanokar does not support Corona to co-operate with the administration

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)