‘उधार’ राजाचे जाहीर आभार; फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी आज विदर्भातील विकासकामांची पाहणी केली. मदत जाहीर केली. यावर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ‘राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदत निधीवर ‘उधार’ राजाचे जाहीर आभार’ अशी बोचरी टीका केली.

उद्धव ठाकरे यांचा अधिवेशन वगळता १४ महिन्यांतील आज पहिला नागपूर दौरा आहे. या दौऱ्यापूर्वी कालच शेतकऱ्यांच्या अंतिम मदतीचा जीआर जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील सहा  जिल्ह्यांतील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रचंड अशी ११ कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली, असे उपरोधाने म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भात जाणे स्वागतार्ह आहे.

पण फक्त दौरा करून चालणार नाही. गोसेखुर्दसहित विदर्भाच्या विकासासाठी निधी दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले होते. त्या निर्णयांना निधी देण्याची गरज आहे. पक्ष कोणताही असला तरी चालेल; पण विदर्भाचा विकास हा महत्त्वाचा आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणालेत.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेचा भाजपला सर्वात मोठा धक्का; ११ नगरसेवक शिवबंधनात अडकणार, नाशिकची सत्ता जाणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER