पवारांच्या कृपेमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अन्यथा कोणी केला नसता – नारायण राणे

Sharad Pawar - Uddhav Thackeray - Narayan Rane

सिंधुदुर्ग :- महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कृपेमुळे सत्तेत आहे. नाही तर असा मुख्यमंत्री कोणी केला असता? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं म्हणणं कोणीही ऐकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राची ही अवस्था आहे. या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा किती तरी हुशार आणि कायदे माहिती असलेला आहे, अशी खरमरीत टीका भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली. पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरणाबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे म्हणणे कोणीही ऐकत नाही. कारवाई केली तर आपल्या बाजूने आहेत तीही लोक आपल्याला सोडून जातील. ते केवळ आपल्या घरातून बोलतात. लोकांसमोर येऊन बोलत नाहीत. मंत्रालयात ते येत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना सांगतात. इतरांना ५० माणसं जमवू द्यायची नाही आणि संजय राठोडवर काय कारवाई केली? टीव्हीवरून बोलत असताना लोकांना प्रश्न विचारतात, तुम्ही काही उत्तर देत नाही. लोक समोर नव्हते. त्यांचं कोणीही ऐकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राची ही अवस्था आहे, असेही नारायण राणे म्हणाले.

तुम्ही मेहनत करून ऑडिओ क्लिप्स  बाहेर काढली; पण एवढं असताना अद्यापही चौकशी झालेली नाही. त्या ऑडिओ क्लिप्समध्ये आवाज कोणाचा आहे, संभाषण कोणाचं आहे, तिला डॉक्टरकडे ने, हे कर ते कर, हा आवाज कोणाचा आहे? संजय राठोड १५ दिवसांनी सांगतात, भाजप कुटुंब उद्ध्वस्त करायला निघाले, भाजपला काही कामधंदे नाहीत का? असा सवालही राणेंनी उपस्थित केला.

कोण आला रे कोण आला बंजाऱ्यांचा वाघ आला. पूजा चव्हाण यांचा मृत्यू आत्महत्येने झाला की त्यांचा खून झाला हे अद्याप समोर आलेलं नाही. पण राठोड आणि पूजा यांच्या ११ व्हिडीओ क्लिप्स  समोर आल्या आहेत. या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव घेतलं जात होतं. ते १५ दिवसांपासून गायब होते. नंतर ते बाहेर पडले आणि मंदिरात गेले. ते संत आहेत का मंदिरात जायला? त्यांच्यावर आरोप आहेत. आरोपाला सामोरे जा. पळ कशाला काढतात? मग क्लिपचा आवाज खरा आहे की खोटा आहे हे आधी सरकारने आम्हाला सांगावं. सरकार विनयभंग, बलात्कार, खून करणाऱ्या लोकांना पाठीशी घालतं. सरकार सुशांतसिंग, दिशा सालियान, पूजा केस या सर्व केसमध्ये आरोपींना पाठीशी घालत आहे. या सरकारला लायसन्स परवाना दिला आहे का? असे म्हणत राणे यांनी आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

बलात्कार केलेल्या माणसांना वाघ म्हणता तुम्ही? ही तर कमाल आहे. मी आता त्यांना संत म्हणतो. संत संजय राठोड (Sanjay Rathod) लगे रहो. समाजाने जो विकासकामे करतो त्याच्या पाठीमागे जावं. कुठलंही कृत्य करणाऱ्याच्या पाठीमागे जाऊ नये, असं माझं सांगणं आहे. वाघ असेल तर सांभाळा. सरकारने सांभाळावं. पिंजऱ्यात ठेवा नाही तर मातोश्रीत एक पिंजरा लावून ठेवा, असेही राणे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER