सर्व वंचितांचे आभार; आपल्या सहकार्यामुळे परिवर्तन नक्कीच होणार! – प्रकाश आंबेडकर

सोलापूर : सर्व सोलापूरकरांचे आभार! उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पूर्ण मतदारसंघ रस्त्यावर उतरला ही परिवर्तनाची नांदी आहे. ही लढाई माझी नसून आपल्या सर्वांची आहे. हे तुम्ही आज दाखवून दिले. आपल्या सहकार्यामुळे परिवर्तन नक्कीच होणार आहे. सोलापूर तर सोडाच; परंतु अमेठी आणि रायबरेलीसुद्धा काबीज करू शकतो, असा इशारा सोलापूर लोकसभेचे वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांना दिला.

ही बातमी पण वाचा : आंबेडकरांना अरविंद केजरीवालांची साथ ; वंचित बहुजन आघाडीचा करणार प्रचार

सोमवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांच्या उरात धडकी भरेल, अशी विराट रॅली काढून जबरदस्त शक्तिप्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आंबेडकर माध्यमाशी बोलत होते. ते म्हणाले की, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे केवळ वय झाल्यामुळेच आणि तोल गेल्याने, असे आरोप करत आहेत. संविधानाचा आपण खून केल्याचा शिंदे यांचा आरोप हास्यास्पद आहे. शिंदे जेवढे आरोप करत राहतील तितके मतदान आपल्या बाजूने वाढणार आहे. लोकशाहीला हुकूमशाही करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. प्रत्येक मतदारसंघ काही जणांची राजेशाहीची सरदारकी झाली आहे. सरदारक्या संपून लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे, असे आमचे मत आहे. सोलापूरच्या गिरण्या आज बंद पडल्या आहेत. येथील राजकारण जमिनीभवती आहे. सोलापुरात टेक्सटाईल पार्क होणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत.

ही बातमी पण वाचा : प्रकाश आंबेडकर अकोल्यातून माघार घेणार?

टेक्सटाईलसाठीचा सुमारे २२ हजार कोटींचा व्यवसाय गुजरातमध्ये गेला आहे. शिंदे यांनी लक्ष घातले असते तर सोलापूरचे चांगले झाले असते, असा आरोपसुद्धा आंबेडकर यांनी केला. दरम्यान, सध्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांमध्ये वंचित बहुजन आघाडी ढाल व तलवार या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. असे पोस्ट खूप जोमाने वायरल होत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचा ढाल व तलवार या चिन्हाशी कोणताही संबंध नाही. हा प्रचार निव्वळ खोडसाळ आहे.

ही बातमी पण वाचा : देश चालविण्यासाठी बुद्धीची गरज, छप्पन्न इंची छातीची नाही : प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्यावर जाहीर केले जाईल. फेसबुक, ट्विटर, शेअरचॅट आणि व्हॉट्सअपवर पसरवली जात असलेली ही माहिती खोटी आहे, असे स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले.