‘धन्यवाद मोदी सरकार’, पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी

Maharashtra Today

पुणे : सतत वाढत असलेल्या इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP ) आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यात मोदी सरकारच्या विरोधातील बॅनर लावून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे. ‘धन्यवाद मोदी सरकार’ (Thank you Modi Government), अशा आशयाचे बॅनर्स लावून सर्वसामान्यांवरचा महागाईचा मार कमी करावा, अशी मागणी या बॅनर्सच्या माध्यमातून केली गेली आहे.

केंद्र सरकारने दररोज केलेली गॅस दरवाढ (Gas price hike)असो वा पेट्रोल डिझेल (Petrol – diesel) दर याबाबत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. फेब्रुवारी महिन्यांत ६७० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलेंडरच्या दरात १०० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे सध्या हा गॅस सिलेंडर ७७० रुपयांना विकत घ्यावा लागत आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वाधिक गॅस दरवाढीची नोंद ही फेब्रुवारी महिन्यातली आहे. आता पुन्हा मार्च महिन्यात गॅस दरवाढ ५० रुपयांनी वाढली. त्यामुळे आज हा दर ८२० रुपयांपर्यंत गेला आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीचा काँगेसला जबर धक्का, नाशिकचा बडा नेता २५ तारखेला घड्याळ बांधणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER