ठाणे : महिलेचा मोबाईल पळविण्याचा प्रयत्न; रेल्वे पोलिसांनी पकडले रंगेहात

MD for sale 1 arrested in thane

ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या आवारातील रिक्षातून घरी चाललेल्या महिलेचा मोबाईल हिसकावून पळणा:या मुंब्रा,अमृतनगर येथील शाहरूख सैय्यद रहमान काझी (26) याला मुंब्रा रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडून ठाणो शहर पोलीस दलातील मुंब्रा पोलिसांच्या हवाली केली.त्याच्याकडून 38 हजारांचे दोन मोबाईलही जप्त केले आहेत. या घटनेच्या तद्पूर्वीच त्याला मुंब्रा रेल्वे स्थानकात गुटखा चघळत असताना मुंब्रा आरपीएफ पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करत,त्याच्याकडील मोबाईल फोनचे बील असल्याचे पाठवले.त्याचवेळी त्याने महिलेचा मोबाईल चोरून तिला जखमी केल्याची माहिती मुंब्रा आरपीएफ पोलिसांनी दिली.

मंगळवारी सांयकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा आरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक अमीत यादव हे साध्या वेषात गस्त घालत होते. त्यावेळी शाहरूख हा रेल्वे स्थानकात घुटमळत असल्याचे दिसून आले. तसेच त्याच्या हालचाली संशयस्पद असल्याने त्याच्यावर आरपीएफ पोलीस लक्ष ठेवून होते. याचदरम्यान, तो गुटखा चघळत असल्याने त्याच्यावर धूम्रपान केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली. तसेच त्याच्याकडील मोबाइल हा चोरीचा असण्याची शक्यता वर्तवून त्याला त्याचे बील आणण्यासाठी सांगितले. त्यावेळी,तो आरपीएफ कार्यालयातून बाहेर पडल्यावर आरपीएफ पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवले. त्यावेळी लोकलमधून रिक्षाने घरी चाललेल्या यशमीन अली (27) या महिलेचा त्याने मोबाईल हिसकावून पळ काढला. त्याच वेळेस त्याला तातडीने आरपीएफचे पोलीस कॉन्स्टेबल विवेक कतीयार आणि कमलेश ठाकूर आणि महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या रवी जाधव यांनी पाठलाग करत पकडले. आणि त्यांचा संशय खरा ठरला. मोबाईल चोरताना,शाहरूख याची नखेही यशमीन या महिलेच्या हाताला लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.तसेच त्याला मुंब्रा पोलिसांच्या हवाली केल्याची माहिती आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक अमीत यादव यांनी दिली.