पोलिसांवर कारवाई करण्याची ठाणे मतदाता जागरण अभियनाची मागणी

TMJA

ठाणे : क्लस्टरच्या उदघाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्नी ठाण्यात येणार म्हणून त्यांना मागण्याचे निवेदन देण्याची जाहीर मागणी अभियान ने केली. परंतु पोलिसांनी साधे निवेदनही देऊ दिले नसल्याचा आरोप ठाणो मतदाता जागरण अभियानने केला आहे. निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घडवली जाईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यांनी ही भेट घडवून आणलीच नाही, त्यामुळे या पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

क्लस्टर बाबत काही त्रुटी आजही आहेत, त्या दुर करण्यासाठी ठाणो मतदाता जागरण अभियानच्या वतीने गुरुवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात येणार होते. त्यानुसार अभियानच्या पदाधिका:यांनी तयारी केली होती. परंतु सकाळीच पोलीस स्टेशन मधून फोन आला आणि सर्वाना नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जायचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांची निवेदनाची प्रत त्यांना दिली. मुख्यमंत्र्यांना घाणोकर नाट्यगृहात भेटून हे निवेदन त्यांना द्यायचे आहे, तेव्हा आपण तशी व्यवस्था करावी जे मंत्र्यांनी मान्य केले, व वागळे इस्टेट पोलिस आपणास घेऊन तेथे येतील हे मान्य झाले.

त्यानंतर जवळपास तीन तास पदाधिकारी पोलिस स्टेशन मध्ये बसून होते. परंतु प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी नेलेच नसल्याचा दावा या पदाधिका:यांनी केला आहे. दरम्यान कोणतेही कारण न देता अभियानाचे कार्यकर्ते संजीव साने, डॉ.चेतना दिक्षीत, अनिल शाळीग्राम व हजुरी गावठाणातील प्रज्योती प्रभू, बाळा मांडकुलकर , भालचंद्र भोईर यांना डिटेन करून ठेवले, हे बेकायदेशीर कृत्य त्यांनी केले आहे, त्याबद्दल ठाणो मतदाता जागरण अभियानने आता पोलिसांचा निषेध केला आहे. त्यानुसार या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. आम्हाला बेकायदा पोलिस स्टेशन मध्ये कोणतेही कारण न देता बसवून ठेवले, हा आमच्या नागरी स्वातंत्र्यावर घाला आहे, त्यामुळे त्यांच्या विरु द्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.