नियमांचे पालन न केल्यास ऑफिस, दुकाने सील करा; मनपा आयुक्तांचा आदेश

ठाणे : वाढत्या कोरोनाच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी प्रभाग समिती स्तरावरील कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. शर्मा यांनी आज कळवा प्रभाग समितीअतंर्गत विविध ठिकाणांची पाहणी केली. स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, शर्मा यांनी ज्या दुकाने सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि मास्क वापराच्या नियमांचा भंग करेल, त्या तत्काळ सील करावे, असे आदेश परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

प्रभाग समितीअतंर्गत येणारे सार्वजनिक शौचालयांची रोज पाच ते सहावेळा नियमितपणे साफसफाई करावी. तसेच सार्वजनिक किंवा गर्दीची ठिकाणे सॅनिटाईज करावेत. सोबतच मंगल कार्यलये, क्लब या ठिकाणी रोज भेटी देवून, कार्यक्रमांचा आढावा घ्यावा व त्यांच्याकडून माहिती घ्यावी, अशा सूचना विपीन शर्मा यांनी दिल्या.

त्याचप्रमाणे, आरोग्य केंद्रांसाठी औषधांचा साठा करणे, कोविड-१९ चाचणीसाठी आवश्यक यंत्रणा गतिमान करणे, टीएमटीच्या बसेसचा फिरते अँटीजेन चाचणी केंद्र म्हणून वापर करणे, कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत त्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करणे, तेथील सर्वेक्षण करणे, तापाची तपासणी करणे आदी कामांना प्राधान्य द्यावे, असे सूचना विपीन यांनी प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER