ठाण्यातील लोकमान्यनगरात तरुणाची खाडीत उडी घेऊन आत्महत्या

ठाण्यातील लोकमान्यनगरात तरुणाची खाडीत उडी घेऊन आत्महत्या

ठाणे : येथील कशेळी खाडी ब्रीजवर मोटारसायकल उभी करून लोकमान्यनगर पाडा नंबर दोन येथील रहिवासी असलेल्या अरमान इरफान अलवी (20) या तरूणाने सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच,ठामपा अगिशमक दल आणि ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत,तत्काळ त्याचा शोध घेतला. मात्र,शोध घेऊनही तो अद्यापही मिळून आलेला नसल्याची माहिती सूत्रंनी दिली.

अरमान हा सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणो मोटारसायकल घेऊन भिवंडीत कॉल सेंटर येथे कामाला घरातून निघाला होता. दुपारी 3 ते 3.15 वाजण्याच्या सुमारास कशेळी खाडीत कोणीतरी तरूण पडल्याची माहिती कापुरबावडी पोलिसांनी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानुसार,घटनास्थळी आपत्ती कक्ष आणि बाळकुम अग्रिशमक दलाच्या जवानांनी धाव घेत,अरमानने कॉलम नंबर 1/540 येथून खाडीत उडी घेतली होती. त्या ठिकाणापासून काही अंतरार्पयत त्याचा शोध घेतला.परंतू,तो मिळून आला नाही. मात्र, ज्यावेळी उडी घेतली.

ही बातमी पण वाचा : मैदानांसाठी शोध मोहीम सुरु

त्यावेळी खाडीत ओहटी होण्यास सुरूवात झाली होती. तसेच खाडीचे पात्र मोठे असल्याने आणि त्यातच, वाहत्या पाण्यात अरमान हा वाहून गेला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. अरमान याच्या नातेवाईकांनीही घटनास्थळी घेतली. घरची परिस्थिती चांगली असताना त्याने असे का केले असा प्रश्न त्याच्या नातेवाईकांना पडला आहे.

ही बातमी पण वाचा : ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी रिंगरुट