ठाणे घोडबंदर : भुयारी गटार योजना मंदावलेली, तरीही ….

ठाणे :- घोडबंदर पट्यात शहरीकरणाचा वेग जास्त असला तरी, या पट्ट्यात राबवण्यात येत असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाचा वेग मात्र मंदावलेलाच असल्याचे उघड झाले आहे . भुयारी गटार योजनेच्या टप्पा क्रमांक ४ अंतर्गत हे काम येत असून मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते . मात्र आतापर्यंत केवळ ४५ टक्केच काम झाले असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असून हेच काम आता डिसेंबर २०१० किंवा मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे . विशेष म्हणजे एकीकडे या प्रकल्पाच्या कामाला विलंब होत असताना दुसरीकडे तब्बल ४० कोटींचा वाढीव खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो आज होणाऱ्या महासभेच्या मंजुरीठी आणण्यात आला आहे . २४०० पाईल्स करीता ६ मिमी जाडीचे लायनर टाकण्यासाठी मालवाहनीनी टाकण्याच्या आणि उदंचन केंद्र बांधण्याच्या, उदंचन केंद्राच्या ठिकाणी यंत्रसामग्री बसवणे तसेच काही अतिरिक्त कामे असा मिळून एकूण ४० कोटींचा वाढीव खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून महासभा या प्रस्तावावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवीन ठाणे अशी ओळख निर्माण झालेल्या घोडबंदर परिसरात निधी अभावी रखडलेली भुयारी गटार योजना मार्गी लावण्यात पालिका प्रशासनाला म्हणावे तसे यश आलेले नाही .केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत घोडबंदरच्या भुयारी गटार योजनेसाठी तब्बल १७९.१ कोटींचा जम्बो आराखडा तयार करण्यात आला आहे . पूर्वी जेएनएनयुआरएमअंतर्गत महापालिका क्षेत्रत भुयारी गटार योजना टप्पा १, २ व ३ अंतर्गत मलनिसारण योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत, महापालिका हद्दीतील सुमारे ७१ टक्के भागात ही योजना कार्यान्वित करण्यात आहे. टप्प्पा क्रमांक २ आणि ३ चे काम पूर्ण झाले असून घराघरात कनेक्शन देण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे .

टप्पा क्रमांक ४ मध्ये मानपाडा, ब्रम्हांड, हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, वाघबीळ, वियनगरी, आनंद नगर, भाईंदरपाडा, ओवळा, कासारवडवली, नागला बंदर, गायमुख, पानखंडा, टकारडापाडा, सुकुरपाडा अशा परिसराचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत ९ लाख ७९ हजार ७११ एवढी लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. या कामाअंतर्गत पंप हाऊस बांधणो, एस.टी.पी. प्लॉन्ट उभारणे , पाईपालाईन टाकणो आदींसह इतर कामे करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्राकडून ५९ . ६६५ कोटी, राज्य शासनाकडून २९. ०८ कोटी आणि पालिकेकडून ८९. ५०५ कोटी असा खर्च केला जाणार आहे. मात्र विविध तांत्रिक कारणांमुळे तब्बल ४० कोटींचा वाढीव खर्च वाढवण्यात आला असून या वाढीव खर्चाचा प्रस्ताव आज होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी आणण्यात आला आहे .

अधिकाऱ्यांची खेळी असल्याचा अर्चना मणेरा यांचा आरोप –

या प्रस्तवाच्या मंजुरीला भाजपच्या नागरसेविका अर्चना मणेरा यांनी मात्र विरोध दर्शवला आहे . अधिकारी कशा प्रकारे पालिकेच्या निधीचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला असून दोन महिन्यांनुर्वीच त्यांनी यासंदर्भात प्रशासनाला पत्राच्या माध्यमातून काही माहिती मागवली होती. यामध्ये त्यांनी टप्पा क्रमांक ४ संदर्भात काही प्रश्न विचारले होते. यामध्ये ठेकेदारांनी दिलेल्या मुदतीमध्ये काम केले नाही तर संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करणार . तसेच संबंधित ठेकेदाराला वाढीव खर्च देण्यात येणार आहे . यावर प्रशासनाच्या वतीने वेळेत प्रकल्प पूर्ण नाही केला तर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच वाढीव खर्च देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट उत्तर दिले असल्याने या प्रकल्पावर आता संशय निर्माण झाला आहे . प्रकल्प आखताना या तांत्रिक गोष्टी प्रशासनाच्या लक्षात आल्या नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित करत या वाढीव खर्च्याच्या प्रस्तावाला त्यांनी आपला विरोध दर्शवला आहे .