ठाणे जिल्ह्यात 24 तासात 315 मीमी पावसाची नोंद

thane news

ठाणे :- प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात देखिल पावसाने दामदार हजेरी लावली आहे. मागील 24 तासात 315 मीमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून शहापुर तालुक्यात सर्वाधिक पाऊस 60 मीमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

मुंबई – ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात मागील चार ते पाच दिवसापासून पावसाने मुसळधार बरसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापुर या भागाला पावसाचा चांगलाच फटका बसला असून मुसळधार पावसामुळे धरणे भरून वाहू लागली आहेत. सोमवारी पावसाने रिमझीम सुरुवात केली होती. तर, दुपार नंतर काही काळ विश्रांती घेतली. ठाणे जिल्ह्यात मागील 24 तासात 315 मीमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, ठाणे शहारात मागील 24 तासात 39.32 मीमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासात ठाणे महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे 20 तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये आग लागण्याच्या 4, झाड पडण्याच्या दोन, झाडांच्या फांद्या पडल्याच्या दोन, धोकादायक झाडाची एक, गॅस सिलेंडर लिकेजच्या दोन, प्लॅस्टर पडल्याची दोन आणि इतर 7 अशा एकूण 20 तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यात शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात देखिल पावसाचा जोर पहायला मिळत आहे. शहापुर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 60 मिमी पावसाची नोंद झाली तर ठाणे शहरात 35 मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल कल्याणमध्ये 51.40 तर मुरबाड तालुक्यात 42 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अंबरनाथ मध्ये 42 मिमी तर उल्हासनगरात 50 मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

ही बातमी पण वाचा : अजून दोन दिवस पावसाचा जोर