ठाणे शहरावर राहणार आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर

Drone camera-Thane

ठाणे : ठाणे शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यानंतर आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आणखी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील अनाधिकृत बांधकामांना आळा घालण्याबरोबर खाडीतील नष्ट होणाऱ्या कांदळवणावर नजर ठेवण्यासाठी शहरावर आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर ठेवली जाणार आहे. येत्या 5 फेब्रुवारी पासून पालिकेचा या कॅमेऱ्याचा पायलेट प्रोजेक्ट सुरु होणार आहे. तर 6 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते महापालिकेच्या सीसीटीव्हीच्या कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरचे लोकार्पण केले जाणार आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संपुर्ण शहरात 1200 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून हे कॅमेरे हाजुरी परिसरातील महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात आले आहेत. या नियंत्रण कक्षाचे लोकार्पण आता होणार आहे. नियंत्रण कक्षात बसविण्यात आलेल्या यंत्रणोमध्ये शहराचा नकाशा टाकण्यात आला असून त्याद्वारे शहरातील ठिकाण निश्चित करून तेथील कॅमे:याने टिपलेले चित्रीकरण पाहता येते. ही माहिती पोलिसांना गुन्ह्याच्या तपासासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे. तसेच शहरात कुठेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याची माहिती सीसीटिव्ही कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण कक्षाला तात्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्याठिकाणी तात्काळ उपाययोजना करणो शक्य होणार आहे.

या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीची माहिती वाहतूक पोलिसांना मिळणार असून त्याचबरोबर सोनसाखळी चोरीसह रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना मदत होणार आहे. असे असले तरी एका ठराविक उंचीवरील आणि समोरील चित्रीकरण कॅमेऱ्यात होणार आहे. मात्र, एखाद्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली तर ती नेमकी कशामुळे झाली, याबाबत माहिती मिळणो शक्य होणार नाही. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता शहरातील सार्वजनिक ठिकाणांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कॅमे:याच्या चित्रीकरण 100 ते 150 फुटावर केले जाणार असून त्यामुळे काही किलो मीटरच्या परिसराचे चित्रीकरण त्यात होणार आहे. त्याद्वारे कोंडी कशामुळे झाली आणि ती सोडविण्यासाठी उपाययोजना करणो शक्य होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. याशिवाय ठाणो महापालिका क्षेत्रत होणारी अनाधिकृत बांधकामे आणि खाडी किनारी भागातील कांदळवनावर भराव टाकून होणारे अतिक्र मण यावर ड्रोन कॅमे:याची नजर राहणार आहे. त्यामुळे ही अतिक्रमणो रोखणो शक्य होतील. तसेच ड्रोनकडून टिपल्या जाणाऱ्याचित्रीकरणाच्या आधारे शहरात पायाभुत सुविधा पुरविणो शक्य होणार आहे. याशिवाय, शहर सुरक्षित ठेवण्यासाठीही ड्रोनची मदत होणार आहे.

त्यानुसार पहिला पायलेट प्रोजेक्ट येत्या 5 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. त्यानुसार यामध्ये सुरवातीला 1 ड्रोन कॅमेरा उपलब्ध करुन दिला जाणार आहे. दोन आठवडा हा प्रयोग सुरवातीला केला जाणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या तीन परिमंडाळमध्ये हा कॅमेरा आलटून पालटून नजर ठेवणार आहे. त्यानुसार परिमंडळ एक मध्ये दिवा, कळवा, मुंब्रा, परिमंडळ दोन मध्ये नौपाडा, वागळे आणि उथळसर तर परिमंडळ 3 मध्ये माजिवाडा, वर्तकनगर, लोकमान्य सावरकर या विभागांचा समावेश आहे. या तिन्ही परिमंडळात दोन दिवसाआड हा ड्रोन वापरला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढे आणखी दोन ड्रोन घेऊन त्यामाध्यातून शहरावर उंचावरुन भिरभिरती नजर ठेवली जाणार आहे. पहिल्या टप्यात सकाळ आणि सायंकाळची वेळ निश्चित केली जाणार आहे.