ठाणे भाजप तर्फे आयोजित धरणे आंदोलनात आमदार संजय केळकर यांची सरकारवर घणाघाती टीका

BJP Sanjay Kelkar criticizes Uddhav govt

ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा नेते आमदार संजय केळकर व भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. भाजप नेते आ. संजय केळकर यांच्या भाषणाने आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी ठाण्यातील भाजपा नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

आताचे सरकार हे केवळ स्थगिती सरकार नसून फसवं सरकार आहे अशी घणाघाती टीका आ. केळकर यांनी सरकारवर करून शेतकरी, महिला, तरुण यांना वेठीस धरण्याचं, फसवणूक करण्याचं काम राज्यकर्ते करत आहे. महिलांवर अत्याचारांचे प्रणाम वाढले असून गुहेगार प्रवृत्तीच्या लोकांना या सरकारचा धाक राहिला नाही तर अनेक तरुणांच्या हाताला काम नाही केवळ त्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे असे आ. केळकर यांनी भाषणात बोलताना सांगितले.

अगोदरच्या फडणवीस सरकारवर केवळ सूड उगवण्याचे काम हे सरकार करत असून लोकांसाठी सुरू केलेल्या योजना केवळ बंद करण्याचे काम हे सरकार करत आहेत. याने रयतेच भलं होणार नाही आणि जनताही यांना माफ करणार नाही असे आ. केळकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपा आक्रमक