कंगनाचा जबरदस्त अभिनय अन् जयललितांचा थक्क करणारा प्रवास, ‘थलायवी’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता (CM Jaylalithaa) यांच्या जीवनावर अधारित चित्रपटाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. या सिनेमात बॉलिवूड क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) जयललिता यांच्या भूमिका साकारणार आहे .

थलायवी हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर अधारित असून, एक यशस्वी अभिनेत्री ते महत्वाकांक्षी नेता असा 30 वर्षांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये जयललिता यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि त्यांनी मिळवलेलं यश चित्रीत करण्यात आलं आहे. जयललितांच्या प्रत्येक व्यक्तीरेखेला कंगनानं पुरेपुर न्याय दिला आहे. हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजी तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमधून जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

दरम्यान या सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहात होते. अशात आता नुकतंच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कंगनाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये जयललिता यांचा अभिनयापासून राजकीय क्षेत्रापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ट्रेलरमधील कंगनाच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER